शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात ८३ नागरिकांनी केली कोरोनावर मात, १०७ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभागाने नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील संशयित रुग्णांची शोधमोहीम सुरू केली. शनिवारी जवळपास १०० नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले.

ठळक मुद्देएकूण बाधित १९६ । आतापर्यंत सहा जणांचे बळी, संशयितांची शोधमोहीम सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १९६ वर पोहोचली आहे. यातील सहा जणांचे मृत्यू झाले तर ८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे तालुक्यात तूर्तास अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०७ झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. गुरुवारी २४ तर शुक्रवारी ५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. केवळ दोन दिवसात तब्बल ७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सतत दोन दिवस कोरोनाचा ब्लास्ट झाल्याने यंत्रणासुद्धा दबकून गेली होती. आरोग्य विभागाने नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील संशयित रुग्णांची शोधमोहीम सुरू केली. शनिवारी जवळपास १०० नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापूर्वीचे २२१ स्वॅबचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. याशिवाय यंत्रणेने दोन हजार रॅपिड टेस्ट किटची मागणी केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी दिली.सध्या शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे. या क्षेत्रात पालिकेतर्फे घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. प्रत्येक वॉर्डात फवारणी सुरू असल्याचे मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड यांनी सांगितले. कोरोना नियंत्रित करण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टींग व ट्रिटमेंट सूत्रीचा अवलंब केला जात असल्याचे डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १०९ वर पोहोचली असल्याचे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी सांगितले.आसारपेंड येथील कोविड सेंटरची साफसफाईशहर व तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे यंत्रणेची धावपळ सुरू आहे. संशयित रुग्णांना आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले जाते. या सेंटरची साफसफाई केली जात आहे. दररोज सफाई कर्मचारी कोविड सेंटर व बाजूचा परिसर स्वच्छ करीत आहे. संशयितांना कोणताही त्रास होवू नये याची दक्षता घेतली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी सांगितले. याशिवाय शहरातील आयुर्वेद महाविद्यालयामध्ये कोविड सेंटर आहे. तेथेही स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या