शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात वीज प्रश्न गूल

By admin | Updated: October 4, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे.

भारनियमनाचा अतिरेक : ग्रामीणला केवळ दोन-तीन तास वीज यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे. तळपत्या उन्हात गावागावात भारनियमनाचे चटके बसत असताना राजकीय पुढारी मात्र वातानुकूलित वाहनात प्रचारात मग्न आहे. वाळणारी पिके पाहून संतप्त शेतकरी वीज वितरणवर रोष व्यक्त करीत असले तरी त्यांचा आवाज मात्र कुणाच्याही कानावर जात नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने आता वेग घेतला आहे. गावागावात नेते मंडळी विकासाचे स्वप्न विकत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सर्वसामान्यांचा मीच वाली असा डांंगोरा पिटत आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विपरित आहे. महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीन वाळला असून शेतकरी त्यात जनावरे सोडत आहे. तर कपाशीही त्याच वाटेवर आहे. अशा स्थितीत शेतकरी मात्र आशा धरुन पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या १५ दिवसात अचानक वाढलेल्या भारनियमनाने ओलित करणेही शक्य नाही. ग्रामीण भागात दोन ते तीन तासच आणि तेही रात्रीच वीज पुरवठा होत आहे. अशा स्थितीत कमी दाबाच्या विजेमुळे मोटारपंप जळत आहे. त्यावर पर्याय म्हणून डिझेल पंप खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच्याही किंमती दोन-तीन दिवसातच अचानक वाढल्या आहे. शासकीय योजनातील डिझेल पंपाची मागणी करण्यासाठी शेतकरी कृषी विभागात जातात तेथे त्यांची बोळवण केली जात आहे. डोळ्याने वाळणारे पीक पाहून शेतकरी संतप्त होत आहे. वीज वितरणविरुद्ध प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. गावागावातील वीज वितरण केंद्रावर शेतकरी धडकत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. फुलसावंगी येथील वीज वितरण केंद्राची तर शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या दिवशी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संताप समजून घ्यायला कुणी तयार नाही. उलट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील गव्हळा येथे केवळ तीन तास होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झाले. त्यांनी सावर येथील वीज उपकेंद्रावर धडक दिली. साहित्याची फेकाफेक केली. मात्र त्यांचा प्रश्न समजून न घेता १० ते १५ लोकांवर गुन्हे दाखल केले. असेच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत कोणताही उमेदवार आणि पुढारी विजेचा प्रश्न घेऊन जाब विचारताना दिसत नाही. केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहे. (नगर प्रतिनिधी)