पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 05:00 AM2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:11+5:30

याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीएचके घर मिळणार आहे.

Project of 25 police houses towards completion | पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

पोलिसांच्या २५ घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

Next
ठळक मुद्देमारेगाव पोलीस ठाणे : पोलिसांना लवकरच मिळणार प्रशस्त घर

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : अनेक वर्षे इंग्रजकालिन वसाहतीमध्ये नरकयातना भोगणाऱ्या पोलिसांना आता उत्तम प्रकारच्या प्रशस्त सदनिकांचे वाटप एक महिन्यात होणार आहे.
मारेगाव येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली, त्यावेळी पोलिसांना राहण्यासाठी इंग्रजकालिन वसाहतीची निर्मिती करण्यात आली होती. ही पोलीस वसाहत तेव्हाच्या काळात तालुक्याचे आकर्षण ठरले होते. परंतु काळाच्या ओघात वसाहत जीर्ण झाली. या वसाहतीत राहणाऱ्या  कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय नरकयातानांचा अनुभव घेत जगत होते. याविषयी ‘लोकमत’ने अनेकदा वृत्तही प्रकाशित केले होते. अखेर पोलीस प्रशासनाने मारेगाव येथे पोलिसांसाठी निवासस्थाने बांधकाम करण्यास अनुमती दिली. चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. आता याठिकाणी भव्य तीन मजली दोन इमारती बांधल्या असून २५ कुटुंबियांना वन-बीएचके घर मिळणार आहे.
इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून वीज जोडणीचे काम तेवढे शिल्लक आहे. या दोन बिल्डींगच्या अगदी शेजारीच पोलीस निरीक्षक यांच्यासाठी स्वतंत्र निवासस्थान आहे. तेथे सर्व सुविधा आहे. याठिकाणी २५ घरांची व्यवस्था करण्यात आली असली तरी पोलीस ठाण्यात ५० कर्मचारी असल्याने उर्वरित कर्मचाºयांना मात्र किरायाच्या घरातच राहावे लागणार आहे.

Web Title: Project of 25 police houses towards completion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस