शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला बाजारात अवघ्या दीड हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे.

ठळक मुद्देशेतकरी लुटला जातोय : शेतमाल ओला आणि डागी असल्याचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसामुळे शेतातील आणि काढलेलेसुद्धा सोयाबीन भिजल्याचा फायदा उठवित खुल्या बाजारात व्यापार्यांनी सोयाबीनचे दर पाडले आहेत. अवघा दीड हजार रुपये क्विंटल भाव दिला जात असल्याने शेतकरी खुलेआम लुटला जातोय.अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा अवसानच गळाले आहे. शेतीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.आसमानी संकटांसोबत शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात कपाशी पिकावर दहिया रोगाचे आक्रमणसततच्या पावसाने कापसावर दहिया रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे कपाशीची पाने पांढरी पडली आहेत. आता कपाशी काळवंडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. कापसावरील उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. जिल्ह्यात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. अती पावसाने विविध किडींचे आक्रमण कापसावर होत आहे. यावर्षी दहिया रोगाने या कपाशीवर हल्ला चढविला आहे. यामुळे पाने पांढरी पडत आहेत. पातीगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यापूर्वी अतिपावसाने लागलेल्या पात्या गळाल्या होता. आता दहिया रोगाने कापूस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही भागात लाल्याचा प्रकोप झाला आहे. शेतशिवार पावसाच्या प्रकोपाने हादरले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्या असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. दहिया रोगाचा प्रकोप सर्वत्र पहायला मिळत आहे. हा प्रकार पावसाने आणि वातावरण बदलाने झाला आहे. शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना कराव्या असा सल्ला येथील मध्य विदर्भ विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती