शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तूरडाळीचे भाव गगनाला

By admin | Updated: October 14, 2015 02:53 IST

केंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ ..

४५ रुपयांची विक्रमी वाढ : दर कमी करण्याचे केंद्राचे आश्वासन फोलनीलेश यमसनवार पाटणबोरीकेंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ आता तब्बल ४५ रूपयांनी वाढून १७५ रूपये प्रति किलो झाली आहे. परिणामी गृहिणींचे बजेट बिघडले असून जेवणातून आता वरण गायब होते, की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.गतवर्षी कमी झालेला पाऊस व तूरीच्या अत्यल्प उत्पादनामुळे चालू वर्षातील तूरडाळीचा साठा आता संपत आला आहे. त्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते. घाऊक बाजारात आता प्रति किलो १७५ रूपये किंमत पोहोचल्याने किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव २०० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे गरिबाच्या ताटातील वरण गायब झाले आहे. तूरडाळीपाठोपाठ अन्य डाळीच्या दरातही वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील किराणाच्या सर्वात मोठ्या मंडीत घाऊक बाजारात तूरडाळ १७५ रूपये प्रती किलो, चनाडाळ ६३, चिल्टा मूगडाळ १००, मूगमोगर ११५, बरबटी मोगर ८०, चिल्टा उडदडाळ १३५, उडदमोगर १५५, मसूरडाळ ८० रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. तूरडाळीची भाववाढ लक्षणीय असून आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतकी भाववाढ झाली आहे. साखरेचे भाव घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी २ हजार १५० रूपये प्रति क्विंटल होते. आता ते २ हजार ७५० रूपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या भावात दोन महिन्यात ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. २५ रूपये प्रति किलो मिळणारी साखर आता ३० रूपये किलो विकली जात आहे. तसेच शेंगदाण्याचे भाव घाऊक बाजारात ९० रूपये किलो आहे. किरकोळ बाजारात ते १०० रूपये प्रति किलो आहे. फुटाणा (दालीया) घाऊक बाजारात ८० वर पोहोचला असून किरकोळ बाजारात ९० ते १०० रूपये किलो विकला जात आहे. तांदूळाच्या किंमतीत सुमारे २०० ते ४०० रूपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. नवरात्रात उपवासाकरिता लागणारे शेंंगदाणे, साबुदाणा, भगरच्या किंमतीही वाढल्या आहे. येत्या काही दिवसांत पोहा, मुरमुराच्या किंमतीसुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत. केंद्र व राज्य शासनाने तूरडाळीच्या किंमती कमी करण्याकरिता उचलेली पावले सपशेल अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत चालला आहे. कापसाला तीन हजार ९५० ते चार हजार रूपये भाव खासगी बाजारपेठेत मिळत असून यावर्षी शेतकरी हवालदील झाला आहे.