शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा, पुसद, महागावात दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना तडाखा दिला. शेकडो हेक्टर जमिनीवर पाणी साचले. नदी-नाल्यांना पूर आले. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा कयास आहे. 

ठळक मुद्देयवतमाळ तालुक्यातही संततधार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री केली. सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात ३७.९ मिमी इतका कोसळला. त्या खालोखाल पुसदमध्ये ३३.७ मिमी, महागावमध्ये २२ मिमी, तर यवतमाळ तालुक्यात २४.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पुसद तालुक्यातील काही गावांना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना तडाखा दिला. शेकडो हेक्टर जमिनीवर पाणी साचले. नदी-नाल्यांना पूर आले. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा कयास आहे. वादळ व पावसामुळे पुसद ते दिग्रस मार्गावरील वाहतूकही काही काळ खोळंबली होती. पार्डी येथील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे पार्डी ते जांबबाजार रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती. तालुक्यातील शेलू खुर्द येथील नाल्यालाही पूर आला. त्यामुळे बान्सी ते चोंढी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारीसुद्धा पावसाने तालुक्याला तडाखा दिला होता. 

शेती नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी - बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांनी नुकतीच खरिपासाठी मशागत केली होती. नांगरणी आणि वखरणी केलेली माती पावसाने वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बिकट संक़ट उभे ठाकले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज, गुरुवारी पंचनामे होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस