शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या शोधात चिमुकल्याने सोडले प्राण

By admin | Updated: July 23, 2014 00:11 IST

मध्यरात्री १२ वाजताची वेळ. पावसाची रिपरिप. किर्रर्र अंधार. आजारी बाळाला घेऊन डॉक्टरांचा शोध. आर्त हाक देऊनही मातेचा आवाज डॉक्टरांच्या कानावर गेलाच नाही. अखेर शासकीय रुग्णालय गाठले.

‘सेवा’ ऐरणीवर : डॉक्टरांच्या कानावर माऊलीची आर्त हाक पोहोचलीच नाहीकिशोर वंजारी ल्ल नेर मध्यरात्री १२ वाजताची वेळ. पावसाची रिपरिप. किर्रर्र अंधार. आजारी बाळाला घेऊन डॉक्टरांचा शोध. आर्त हाक देऊनही मातेचा आवाज डॉक्टरांच्या कानावर गेलाच नाही. अखेर शासकीय रुग्णालय गाठले. परंतु तोपर्यंत चिमुकल्यावर काळाने झडप घातली होती. किर्रर अंधारात मातेचा टाहो अनेकांचे हृदय हेलावून गेला. नेर येथे घडलेल्या घटनेने डॉक्टरांची ‘सेवा’ ऐरणीवर आली. नेर येथील फुकटनगरात दिनेश कोहळे अंध गृहस्थ राहतात. शहरात भीक मागून चरितार्थ चालवितात. त्यांंची मुलगी आपल्या चिमुकल्या बाळासह अठराविश्व दारिद्र्य असलेल्या झोपडीत राहते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाळाची अचानक प्रकृती बिघडली. डॉक्टरांकडे जाण्याची तयारी झाली. बाळाला घेऊन ही माता सैरावैरा शहरात निघाली. किर्रर्र अंधार चिरत ती खासगी दवाखान्यांचे दार ठोठावू लागली. परंतु कुणीही तिची हार्तहाक ऐकली नाही. या दवाखान्यातून त्या दवाखान्यात जात होती. मात्र कुणीही उपचारासाठी प्रतिसाद देत नव्हते. दरम्यान १२.३० च्या सुमारास ती चिंतामणी चौकात आली. एका स्थानिक तरुणाला तिने आपबिती ऐकविली. त्या तरुणाच्या मदतीने बाळासह अगतिक माता शासकीय रुग्णालयात पोहोचली. मोठ्या आशेने रुग्णालयाच्या पायऱ्या चढली. डॉक्टरांनी बाळाची तपासणी सुरू केली आणि घात झाला. दरम्यानच्या काळात कधी तरी या बाळाने अखेरचा श्वास घेतला. मातेला बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगताच तिने किंकाळी फोडली. तिचा हा टाहो अनेकांच्या हृदयाला पाझर फोडणारा होता. कदाचित एखाद्या डॉक्टराने आपला दरवाजा उघडला असता तर बाळाचा मृत्यू झालाच नसता. शासकीय रुग्णालयातील डॉ. शारिक इकबाल यांनी या बालकाचा मृत्यू दूध कुशीत अडकल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने झाल्याचे सांगितले. केवळ वेळेवर उपचार न मिळाल्याने एका चिमुकल्याला प्राण गमवावा लागला.