लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :वीज वितरण कंपनीने थकीत बिलाच्या विरोधात वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत तीन हजार ग्राहकांची कंपनीने वीज कापली आहे. या ग्राहकांकडे १२० कोटी थकले आहेत. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी वीज कंपनीने नोटीस बजावली. मात्र यानंतरही थकीत वीज बिल न भरल्याने कंपनीने ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यात विविध वर्गवारीतील १५ लाख ग्राहक वीज वितरण कंपनीकडे आहेत. यामध्ये कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्याचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांचा यात समावेश आहे.
वीज कापल्याने व्यवसायावर आले गंडांतरवीज वितरण कंपनीने दिलेले बिल अवास्तव असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यातून अनेक ग्राहकांना वीज बिल भरता आले नाही. या ग्राहकांचे व्यवसाय आता ठप्प झाले आहे. यातून ग्राहकापुढे बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.
वीज बिल भरण्यासाठी कार्यालयांना नोटीसशासकीय कार्यालयांकडे १६ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. ही थकबाकी तत्काळ भरावी म्हणून वीज कंपनीने शासकीय कार्यालयांना नोटीस बजावली आहे. यामुळे पैसे न भरल्यास शासकीय कार्यालयात अंधार होणार आहे
१० दिवसांत १०० कोटी वसुलीचे कंपनीपुढे आव्हानथकीत वीज बिलाची परतफेड करण्यासाठी वीज कंपनीने नोटीस बजावली आहे. प्रत्यक्षात १२० कोटी ७७ लाख रुपयांच्या थकबाकीपैकी २५ कोटी रुपयांचा वीज बिल भरणा करण्यात आला आहे. महिन्याच्या उरलेल्या दहा दिवसांत मोठी थकबाकीची वसूल करावी लागेल.
अंदाजी रीडिंगच्या तक्रारी
- अनेक ग्राहकांनी वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून रीडिंगसाठी खासगी यंत्रणा उभी केली. ही यंत्रणा आता कुचकामी ठरत आहे. अनेक ग्राहकांकडे कडे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी पोहोचत नाही. अंदाजी बिल दिले जाते.
- हे बिल कमी होत नाही, अनेक तक्रारी नंतर त्याच्या २ तपासणीकरिता यंत्रणेचे कर्मचारी पोहोचत नाही. यातून अनेक ग्राहकांचे बिल थकले आहेत. यातून ग्राहकांमध्ये कंपनीबद्दल नाराजी आहे.
- महागाव तहसील कार्यालयातील वीज कापण्यासाठी कारवाई करण्यात आली. मात्र, कार्यालयाने त्यांना काही दिवसांचा अवधी मागितला आहे. यामुळे वीज कपातीची कारवाई टळली. याशिवाय पाणीपुरवठा योजनांनाही वीज बिल भरण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत.