शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोतवालाच्या परीक्षेला पदवीधराची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती सुरू असून त्याकरिता चौथी पास हा निकष असताना प्रत्यक्षात पदवीधरालाही डोके खाजवायला लावेल एवढी कठीण प्रश्नपत्रिका काढली गेल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकारामुळे जिल्हाभरातील चौथी ते दहावी उत्तीर्ण शेकडो उमेदवार वंचित राहिले आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकच तालुक्यात कोतवाल पदाची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्येक तालुक्यात किमान दोन डझन जागांची भरती होत आहे. उपविभागीय महसूल अधिकारी हे या भरती समितीचे अध्यक्ष असून तहसीलदार हे सचिव आहेत. अर्थात या भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबविण्याचे, प्रश्नपत्रिका काढण्याचे, तपासण्याचे नियंत्रण एसडीओंकडे आहे. जिल्ह्यात प्रत्येक विभागात वेगवेगळ्या दिवशी लेखी परीक्षा घेतली गेली. मात्र या परीक्षेतील कठीण प्रश्नावलीविरुद्ध आता ओरड सुरू झाली आहे. शासनाच्या नियमानुसार कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्ण हा मूळ शैक्षणिक निकष आहे. त्यामुळे या निकषानुसार प्रश्नपत्रिका निघणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याला सोडविता येईल, अशी प्रश्नपत्रिका एखादवेळी मान्य केली जावू शकते. मात्र प्रत्यक्षात अनेक तालुक्यांच्या प्रश्नपत्रिका या पदवीधर परीक्षांच्या समांतर असल्याच्या तक्रारी पुढे येवू लागल्या आहे. चौथी ते दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कोतवाल पदापासून वंचित ठेवणे हा छुपा अजेंडा या मागे असल्याचा आरोपही होवू लागला आहे. विशेष असे या नोकर भरतीसाठी अनेक दलाल सक्रिय असून आर्थिक उलाढालही सुरू असल्याची चर्चा आहे. पदवीधरांसाठीही आव्हान ठरेल, अशी प्रश्नपत्रिका काढली गेल्याने कोतवालांच्या अनुकंपाधारक वारसांवरही अन्याय होतो आहे. संगणकाचे युग असल्याने सुशिक्षितच कोतवाल असावा, असे समर्थन प्रशासनातून केले जात असले तरी शासनाच्या त्या चौथी पास निकषाच्या आदेशाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कठीण पेपर काढला गेल्याने प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने युवक या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याची भीती आहे. बहुतांश तालुक्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यवतमाळ विभागातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. एसडीओ, तहसीलदारांनाच या भरती प्रक्रियेचे सर्वाधिकार दिले असल्याने अनेक ठिकाणी गौडबंगालाच्या तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाचे या भरतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)