शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; मूर्तिकारांपुढे वाढविते अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याच सुमारास गणेशोत्सव येत आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील, अशा वेळी तयार झालेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच मूर्तिकारांनी राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक सण-उत्सवावरील निर्बंधाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी कोरोनाच्या लाटेत गणेश उत्सव आला होता. यामुळे तयार करण्यात आलेल्या मूर्तीची विक्रीच करता आली नाही. यातून जिल्ह्यातील मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून निघणार नाही तोच दुसराही गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात सापडला आहे. यामुळे मूर्तिकारांनी सावध पवित्रा घेत मूर्ती निर्मितीचे काम थांबविले आहे. यातून शेकडो मूर्तिकार आणि कारागीर बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याच सुमारास गणेशोत्सव येत आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील, अशा वेळी तयार झालेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच मूर्तिकारांनी राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे. सर्वच ठिकाणी मूर्तिकारांनी मोजक्याच मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. यातून वर्षभराचे नियोजन कोलमडले आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात गणेश मूर्ती निर्मितीचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण होते. यावर्षी गणेशमूर्ती निर्मितीचे काम करणारे कारखाने आणि त्या ठिकाणचे कारागीर यांची संख्या रोडावली आहे. या मूर्तिकारांना परिस्थिती काय येईल याची शाश्वती नाही. याशिवाय तयार झालेल्या मूर्ती विकल्या जातील की नाही, याची हमी नाही. याशिवाय गणेश मंडळ आणि घरगुती भक्तांकडून गणेशमूर्तीची ऑर्डर आलेली नाही. यातून मोठ्या गणेशमूर्ती आणि छोट्या गणेशमूर्ती दोन्हीचे काम रखडले आहे. बाजारात मूर्तीला रंग देण्यासाठी लागणारे रंग उपलब्ध नाही. सजविण्यासाठी लागणारे साहित्य नाही, तणस आणि इतर साहित्य मिळणे अवघड झाले आहे. या सर्व बाबींचा परिणाम मूर्ती निर्मितीवर झाला आहे. गतवर्षीच्या राहिलेल्या मूर्ती सजविल्या जात आहे. याशिवाय काही मोजक्याच मूर्ती घडविल्या जात आहे. शासनाचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. संभाव्य काळात निर्बंधाबाबत संदिग्धता आहे. 

बैल आणि कृष्ण मूर्तीही नाही - मूर्तिकार आपल्या संपूर्ण परिवारात वर्षभरात लागणाऱ्या मूर्त्या तयार करतो. यामध्ये पोळा या सणाला विकले जाणारे मातीचे बैल आणि गोकुळाष्टमीला लागणाऱ्या कृष्णमूर्ती तयार केल्या जातात. यावर्षी यामूर्ती घडविण्याचे काम थंडबस्त्यात आहे. 

गणेश मूर्तीच्या संदर्भात काय धोरण असेल याबाबत अद्याप तरी स्पष्ट आदेश नाहीत. मात्र गतवर्षीनुसार चार फुटाची मूर्ती आणि इतर काही बाबी राहू शकतात. परंतु स्पष्ट सूचना आल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. - अमोल येडगेजिल्हाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सव