शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या नात्यातच राजकीय लढाई

By admin | Updated: October 25, 2015 02:21 IST

नगर पंचायतीच्या निवडणुकीत रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती आमनेसामने आहे.

कळंब नगरपंचायत : मामा-भाचा, काका-काकू, आमनेसामने गजानन अक्कलवार कळंबनगर पंचायतीच्या निवडणुकीत रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती आमनेसामने आहे. मामा-भाचा, काका-काकू, पुतणी, सून यांच्यातील नगरसेवक होण्यासाठीची ही लढाई शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. या नगर पंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ९४ उमेदवार आपले भाग्य अजमावीत आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि १३ मधील निवडणूक नात्या-गोत्यातील निवडणूक ठरली आहे. यात कोणते नाते कोणावर भारी पडते, हे पाहणे मोठे रंजकदार ठरणार आहे.प्रभाग सात मध्ये भाचानेच मामाला आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर, या प्रभागातून पुतण्यानेही काकाविरुध्द दंड थोपटले आहे. एकाच नात्यातील लोकांची एकमेकाविरुध्द होणारी ही राजकीय लढाई मनोरंजनाचा विषय ठरली आहे. मामा असलेले दिवाकर सुटकर हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहे, तर भाचा वासुदेव दाभेकर याने भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर मामाला आव्हान दिले आहे. एवढेच नाही, तर दिवाकर सुटकर यांच्या नात्याने पुतण्या लागत असलेले नामदेव लोणकर हे काँग्रेसकडून चक्क काकाला धोबीपछाड देण्यासाठी मैदानात उतरले आहे. मामा-भाचा व काकाच्या या लढाईत कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या लढाईत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच या प्रभागातून सेनेकडून विलास रेंगापूर, बीएसपीकडून ज्योती मरापे आणि विष्णू कोवे हे अपक्ष उमेदवार मैदानात आहे. यात कोणाची सरशी होणार हे निकालानंतरच कळणार आहे.प्रभाग क्रमांक १३ मध्ये खरी लढत एकाच नात्यातील तीन नाईक कुटुंबात आहे. काकु असलेली सुनीता रमेश नाईक हिच्यापुढे पुतणीने म्हणजेच उषा नाईक (कुमरे) हिने तगडे आव्हान उभे केले आहे. एवढेच नाही तर सुन असलेली स्मिता सुनील नाईक हीसुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या या प्रभागात खरी लढाई तीन नाईक घराण्यात पाहायला मिळत आहे. तिनही महिला एकाच परिवारातील असून विविध पक्षाकडून आपले भाग्य अजमावीत आहे. सासु-सुनेच्या लढाईचे किस्से आपण नेहमीच एकतो. परंतु आता राजकारणातील या लढाईत कोण वरचढ होणार, याकडे कळंबवासीयांचे लक्ष लागले आहे. राजकारण कोणाला किती वर नेऊन पोहोचवेल आणि किती खाली जाण्यास भाग पाडेल, हे सांगता येत नाही. याची परिणीतीही कळंब नगर पंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.