शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल रोखणारा ‘आरटीओ’ एजंट

By admin | Updated: October 17, 2016 01:39 IST

येथील शासकीय रुग्णालय परिसरातील वाईनबारमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकावर पिस्तुल रोखणाऱ्यांना

दोघांना अटक : पसार आरोपींचा शोध सुरू यवतमाळ : येथील शासकीय रुग्णालय परिसरातील वाईनबारमध्ये क्षुल्लक कारणावरून युवकावर पिस्तुल रोखणाऱ्यांना पोलिसांनी शनिावरी रात्री दोघांना जेरबंद केले असून त्यातील एक जण आरटीओचा एजंट असल्याचे पुढे आले आहे. इम्तीयाज उर्फ रिंकू खान अयुब खान पठाण (३२) रा. गुलमोहर पार्क यवतमाळ आणि नासीर खान अब्बास खान (३२) रा. गढी वॉर्ड पांढरकवडा असे अटकेतील आरोपींची नावे आहे. यातील इम्तीयाज आरटीओ एजंट म्हणून काम करतो. त्यांना टोळी विरोधी पथकाने शनिवारी रात्री अटक करून त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली कार एम एच ३१ झेड ८८८३ हा समोर तर एम एच ३१ झेड ८ इतकाच मागे क्रमांक असलेली गाडी जप्त केली. या वाहनात एक तलवार आढळून आली. यातील रमिम शेख रफीक शेख आणि अज्जू दोघे रा. मौलाना आझाद वॉर्ड पाढंरकवडा हे पसार आहेत. हे आरोपी यवतमाळात आश्रयाला असल्याची माहिती असून त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार आहे. पाढंरकवडा येथील तिन्ही आरोपी हे मालवाहू वाहन चालवितात. आरटीओ कार्यालयाच्या कामाने ते यवतमाळात आले होते. त्यानंतर दारू पिण्यासाठी वाईनबारमध्ये बसले. त्याचा शेजारी बसलेल्या पंकज कऱ्हाळे याच्याशी वाद झाला. त्यातूनच ही घटना घडली. ही कारवाई टोळी विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, बंडू मेश्राम, अमोल चौधरी, किरण पडघण, विनोद राठोड यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)