शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

पारव्याचे आरोग्य केंद्रच आजारी

By admin | Updated: August 19, 2014 23:59 IST

घाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक

अब्दुल मतीन - पारवाघाटंजी तालुक्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र अशी ओळख असलेल्या पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाच रिक्त पदांचा ज्वर चढला आहे. गेली काही महिन्यांपासून याठिकाणी नागरिकांना समाधानकारक आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. योग्य उपचार होत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. नागरिकांना गावापासून जवळच्या ठिकाणीच उपचार मिळावे यासाठी शासनाने आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश ठिकाणी याचा योग्य फायदा नागरिकांना होत नाही. पारवा आरोग्य केंद्राविषयी हीच परिस्थिती आहे. वैद्यकीय अधिकारी याशिवाय इतर महत्त्वाची पदे गेली अनेक वर्षांपासून रिक्त आहे. कार्यरत अत्यल्प कर्मचाऱ्यांवर आरोग्य सेवेचा भार वाहिला जातो. याशिवाय इतर अनेक समस्याही कार्यरत कर्मचारी आणि उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना भेडसावतात. जिल्ह्याची यंत्रणा मात्र काहीही गंभीर नसल्याचे दिसून येते. परिसरातील ३३ हजार लोकसंख्येच्या आरोग्य सेवेसाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी केवळ एकाच्या भरवशावर आरोग्य सेवा पुरविली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यांच्या जागी अजूनही नवीन वैद्यकीय अधिकारी देण्यात आले नाही. आरोग्य सहायकाचे पुरुष आणि स्त्री ही दोनही पदे रिक्त आहेत. पुरुष आणि स्त्री हे आरोग्यसेवकही याठिकाणी नाही. परिचरांची दोन पदे रिक्त आहेत. सफाई कामगार आवश्यक तेवढे नाही. वाहनचालकही नाही. या आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील २९ गावे येतात. जवळच्या ठिकाणी आणि तत्काळ उपचार मिळावे यासाठी लगबगीने आलेल्या रुग्णांची याठिकाणी घोर निराशा होते. डॉक्टर नसल्याचे कारण सांगून इतर ठिकाणी हलविण्याचा सल्ला उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनच दिला जातो. याशिवाय याठिकाणी प्रसूतीचाही प्रश्न आहे. महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेक रुग्ण खासगीत जात असल्याची माहिती आहे.