शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार पीडितांना मिळणार आधार

By admin | Updated: September 9, 2014 00:40 IST

लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहायक व पुनर्वसनासाठी मनोधैर्य ही योजना राज्यात अंमलात आली. या योजनेंतर्गत पीडितांना तातडीने आधार मिळण्यासाठी व मानसिक

दारव्हा : लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहायक व पुनर्वसनासाठी मनोधैर्य ही योजना राज्यात अंमलात आली. या योजनेंतर्गत पीडितांना तातडीने आधार मिळण्यासाठी व मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य करण्याच्या हेतूने प्रत्येक जिल्ह्यात मनोधैर्य टीम गठित करण्याबाबत नुकत्याच शासनाने स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.प्रत्येक जिल्हास्तरावर करण्यात येणाऱ्या टीममध्ये प्रशिक्षित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यात पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा, तालुका स्तरावरील रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ, नर्स, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अखत्यारितील सर्व संरक्षण अधिकारी, बाल परिविक्षा अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश केला जाणार आहे.लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर संबंधित महिला व बालक यथास्थिती त्याचे कुटुंबीय हे जाब-जबाब देण्याच्या मनस्थितीत नसतात. सदर घटना घडल्यानंतर त्यांना त्या आघातातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे जाब-जबाब कसे नोंदविणे, त्या संदर्भात आवश्यक तो तपास करणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, सदर घटनेबाबत आवश्यक परिस्थतीजन्य पुरावे तसेच त्यांना शेवटपर्यंत सहाय्य करणे आदींसाठी मनोधैर्य टीममधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पुणे येथे राहत कक्षाच्या सहकार्याने तज्ज्ञ साधन व्यक्तीमार्फत प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तसेच पीडितांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मानसोपचार तज्ज्ञ हे प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्यामार्फत संवेदनशीलपणे प्रकरणे हाताळतील. प्रशिक्षण दिलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आयुक्त महिला व बालविकास यांचेमार्फत प्रमाणपत्र आणि मनोधैर्य टीमचे सदस्य असल्याचे ओळखपत्र दिले जाणार आहेत. या शासन निर्णयाबाबत राज्यातील सर्व पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे सुचित केले आहे. (प्रतिनिधी)