शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रसादासाठी परवाना सक्तीचा

By admin | Updated: August 19, 2014 23:58 IST

कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा

सण-उत्सव : धर्मदाय आयुक्तांकडे मंडळाची नोंदणी आवश्यकयवतमाळ : कोणताही धार्मिक कार्यक्रम असो की उत्सव, प्रसाद वितरण आलेच. मात्र आता यापुढे कुणालाही सहज प्रसाद, महाप्रसादाचे वितरण करता येणार नाही. त्यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाचा परवाना घ्यावा लागणार आहे. त्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात मंडळाची नोंदणी केल्यानंतर प्रसाद वितरणाचा परवाना मंडळाला मिळणार आहे. त्यासाठी १०० रूपयांचा खर्र्चही येणार आहे.गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणारा खवा, दुग्धजन्य पदार्थ यातून होणारी विषबाधा लक्षात घेता अन्न व औषधी प्रशासन विभागाने हे पाऊल उचले आहे. मुळात या प्रकारालाच आळा बसावा म्हणून नवा आदेश अन्न आणि औैैैषधी प्रशासन विभागात धडकले आहे. या आदेशानुसार मंडळाला प्रसाद वाटपासाठी परवाना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रारंभी मंडळाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून मिळविलेला स्थापनेचा परवाना अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे सादर करावा लागणार आहे. यासोेबतच मंडळातील सदस्यांची नावे, मोबाईल क्रमांक आणि पत्ताही सादर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणावरून प्रसाद खरेदी केला तेथील पक्के बिल, दुकानाचे नाव सादर करावे लागणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मंडळाला १०० रूपयांचा खर्च येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर अन्न व औषधी प्रशासन कारवाई करणार आहे. २८ आॅगस्ट अंतिम तारीखसार्वजनीक गणेश मंडळाला गणेश उत्सव साजरा करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा परवाना घ्यावा लागतो. ११ आॅगस्टपासून ह्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. २८ आॅगस्टपर्यंत हा परवाना मंडळांना घेता येणार आहे. यावरच प्रसाद वाटपाचा परवाना मिळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दुधाचे उत्पादन घटल्याने येथे खव्याची निर्मिती होत नाही. परिणामी राजस्थान येथून खवा आयात करण्यात येत आहे. त्यामध्ये कुंदा आणि सॅकरीन मिसळून मिठाई तयार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे अन्न औषध प्रशासन विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. (शहर वार्ताहर)