शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी इन्शुरन्सला ग्राहक न्यायालयाचा दंड

By admin | Updated: January 15, 2017 01:16 IST

एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीने वाहनधारकाला विमा दाव्याची रक्कम सव्याज द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे.

दाव्यास टाळाटाळ : वाहनाला अपघातप्रकरण यवतमाळ : एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनीने वाहनधारकाला विमा दाव्याची रक्कम सव्याज द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाने दिला आहे. बोरीअरब येथील पवन भगवतीप्रसाद पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर मंचच्या अध्यक्ष अ‍ॅड. आश्लेषा दिघाडे, सदस्य डॉ. अशोक सोमवंशी यांनी हा निर्णय दिला आहे. पवन पांडे यांच्या टाटा विस्टा या वाहनाला १७ मार्च २०१४ रोजी टायर फुटल्याने नागपूर येथे अपघात झाला. या वाहनाचा विमा असल्याने दाव्यासाठी पांडे यांनी सदर इन्शुरन्स कंपनीकडे अर्ज सादर केला. मात्र कंपनीने विमा दाव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. पांडे यांचे वाहन घरगुती वापरासाठी आहे मात्र त्यांनी घटनेच्या दिवशी ते भाड्याने दिले होते, त्यामुळे विमा दावा देता येणार नाही, अशी बाजू इन्शुरन्स कंपनीने मांडली. मात्र सदर वाहन मित्राला कुठल्याही भाड्याशिवाय देण्यात आल्याची बाब न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सिद्ध झाली. त्यामुळे न्यायालयाने आपल्या निर्णयात एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी नागपूरने पांडे यांना विमा दाव्यापोटी चार लाख ३४ हजार ५४८ रुपये आणि त्यावर १० टक्के व्याज द्यावे, असा आदेश दिला. शिवाय वाहनाच्या दुरुस्तीपर्यंत गॅरेज पार्किंगचा खर्च एक लाख, आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. (वार्ताहर)