जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढले

By Admin | Updated: September 18, 2014 23:41 IST2014-09-18T23:41:31+5:302014-09-18T23:41:31+5:30

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान तापाचे रुग्ण आढळतात. अशी नोंदच आहे. मात्र या वर्षी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले आहे.

Patients with fever increased in the district | जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढले

जिल्ह्यात तापाचे रुग्ण वाढले

यवतमाळ : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान तापाचे रुग्ण आढळतात. अशी नोंदच आहे. मात्र या वर्षी तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले आहे. यात डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. तर ५० रुग्ण डेंग्यूच्या तापातून बचावले आहे.
१८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात दोन हजार ४२४ तापाचे रुग्ण आढळून आले. यामध्ये डेंग्यूचे ५२ रुग्ण होते. यापैकी ५० रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार केला असता ते बरे झाले तर दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात यावर्षी साथीच्या आजारांचा कुठेही उदे्रेक झाला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तापाने कहर केला आहे. हा ताप विषाणूजन्य असला तरी काही रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळत असल्याचे दिसून येते. सौम्य आणि मध्यम स्वरूपाचा ताप असल्यास औषधोपचाराने बरा होतो. मात्र डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये रुग्ण गेल्यानंतर त्याची बचावण्याची शक्यता कमी राहते.
सांधेदुखी, पांढऱ्या पेशी कमी होणे, नंतर रक्तस्त्राव होतो. यातच रुग्णांचा मृत्यू होतो. रुग्णांनी ताप आल्यानंतर तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात अथवा चांगल्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतल्यानंतर हा आजार सहज बरा होतो. शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर डेंग्यूच्या तापाने मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. हिडीस डासापासून या डासांचा प्रादुर्भाव होतो. विशेष उपाययोजनाही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्या आहे. यावर्षी गॅस्ट्रोचा उद्रेक आढळून आला नाही. आतापर्यंत दोन हजार ४३५ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Patients with fever increased in the district