शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:40 IST

कोरोना विषाणूने दुसऱ्या लाटेत महामारीसारखे रौद्र रूप धारण केले आहे. परिणामी, आता नियम पाळणे महत्त्वाचे झाले ...

कोरोना विषाणूने दुसऱ्या लाटेत महामारीसारखे रौद्र रूप धारण केले आहे. परिणामी, आता नियम पाळणे महत्त्वाचे झाले आहे. मात्र, येथील खासगी कोविड सेंटर चालविणारे व हॉस्पिटलमध्येच असलेल्या मेडिकलमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी होत आहे. यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. यात कोरोना रुग्णाचे नातेवाईक व नेहमीच्या उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांचे नातेवाईक एकाचवेळी मेडिकलमध्ये औषधी खरेदी करण्यासाठी येत असल्याने गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न आहे.

आता ज्या खासगी कोविड सेंटरला कोरोना रुग्ण भरती करून उपचार करण्याची परवानगी दिली, त्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला बाहेरून इंजेक्शन खरेदी करून आणावयास लावले जाते. कोविड सेंटरच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या मेडिकलमध्ये इंजेक्शनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध करून न देणाऱ्या हॉस्पिटलची उपविभागीय अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन आढावा घ्यावा व कसूर करणाऱ्या हॉस्पिटलची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईक करीत आहेत.