शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

हीच आमची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

निर्मल गावाच्यादृष्टीने १०० टक्के ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरणासाठी नवीन उद्योगास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजना, लोकशाही कारभार, मतदान यासारखे उपक्रम याठिकाणी राबविले गेले. यात सातत्य असावे, अशी मागणी गावकऱ्यांना घालण्यात आली.

ठळक मुद्देसंडे अँकर । बरबडा गावात आठ दिवस पार पडला दान उत्सव, उद्योग उभारणी, स्वच्छता, शिक्षण व गुणवत्तेसाठी जागर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सक्षमीकरणासाठी महिलांनी नवीन उद्योगाची उभारणी करावी, सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता राखा, शिक्षण घ्या, शैक्षणिक गुणवत्ता सुधारा, असे दान बरबडा या गावात उत्सवाच्या माध्यमातून मागण्यात आले. गावात मोठा बदल व्हावा, अशी प्रार्थनाही यानिमित्ताने करण्यात आली.यवतमाळ तालुक्यात येत असलेल्या बरबडा या गावात ‘स्वच्छता ही सेवा आणि दान उत्सव’ पार पडला. तब्बल आठ दिवस विविध उपक्रम गावकऱ्यांच्या साथीने राबविण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढून गावस्वच्छतेचे संदेश देण्यात आले. सोबतच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, रिलायन्स फाऊंडेशन, अनुलोम फाऊंडेशन, प्रयास फाऊंडेशन या अंतर्गत आठ दिवस दान उत्सव साजरा करण्यात आला.निर्मल गावाच्यादृष्टीने १०० टक्के ग्रामस्वच्छता, महिला सक्षमीकरणासाठी नवीन उद्योगास प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करणे, सुदृढ आरोग्यासाठी उपाययोजना, लोकशाही कारभार, मतदान यासारखे उपक्रम याठिकाणी राबविले गेले. यात सातत्य असावे, अशी मागणी गावकऱ्यांना घालण्यात आली. गाव परिसरातील प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. हातपंप, सार्वजनिक विहिरीजवळील कचरा साफ करण्यात आला. गावाला सॅनिटरी नॅप्कीन डिस्पोझल मशीन देण्यात आली. याचा उपयोग कसा करावा, याविषयी माहिती देण्यात आली.रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक संदीप वायाळ, दिलीप जाधव, प्रयासचे प्रशांत बनगीनवार, मंगेश खुने, वसंत व्यवहारे, अनुलोम संस्थेचे जिल्हा सन्वयक सुरज बाघाडकर, सुरज भाकरे, सरपंच मोहन पवार, उपसरपंच वैशाली मेश्राम, ग्राम परिवर्तक दिनेश खडसे, गणेश झिंगरे, कांचन ठाकरे, विठ्ठल गोरे, मुख्याध्यापिका वनमाला वंजारी, शिक्षक गुणवंत कोंबे, विशाल मेश्राम, ग्रामसेवक श्रीकांत बन्सोड, संत कबीर संस्थेचे अध्यक्ष अरविंद बोरकर, देशमुख, संदीप चव्हाण, संगीता बोईकर, सुषमा राऊत, आशा कुत्तरमारे, रेखा शेंडे आदींनी या उत्सवात परिश्रमाचे दान दिले.