शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

वणीत प्रवासी तपासण्याचा केवळ फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

परसोडा येथे आरोग्य केंद्रावर तिने स्वत: जाऊन तपासणीसाठी आग्रह केला. परंतु तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला केवळ ताप आहे का? एवढी विचारणा करून तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. हा प्रकार पाहून तेजलने माझी व्यवस्थित तपासणी करा, असा आग्रह धरला. परंतु तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तपासण्याची गरज नाही, ताप, सर्दी, खोकला असल्यास तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, असा सल्ला तिला दिला.

ठळक मुद्देजुजबी विचारपूस : हातावर शिक्का मारून केले जात आहे घराकडे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : लॉकडाऊननंतर परराज्य व परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांचे लोंढे आता वणीत पोहोचू लागले असून गुरूवारी रात्रीपर्यंत हा आकडा ४०१ वर गेला. यात आंध्रप्रदेश, पुणे, नागपूर येथून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे असताना बाहेरून येणाऱ्या या नागरिकांची गंभीरतेने तपासणीच केली जात नसल्याच्या तक्रारी आहे. विशिष्ट अंतरावर उभे करून ‘तुम्हाला ताप आहे का?’ एवढीच जुजबी विचारणा केल्यानंतर हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घराकडे पाठविले जात आहे.आरोग्य विभागाच्या या बेगडी तपासणीमुळे वणी शहराला धोका निर्माण झाला आहे. मूळ वणी येथील रहिवासी असलेली तेजल शेंडे ही पुण्यात शिक्षण घेत आहे. तसेच ती नोकरीही करते. मात्र लॉकडाऊनमुळे ती पुण्यात अडकून पडली होती. दरम्यान, आपापल्या गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिल्यानंतर वणीतून पाठविलेल्या एका खासगी वाहनातून ती गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास वणीच्या सिमेवर पोहोचली. त्यानंतर परसोडा येथे आरोग्य केंद्रावर तिने स्वत: जाऊन तपासणीसाठी आग्रह केला. परंतु तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला केवळ ताप आहे का? एवढी विचारणा करून तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. हा प्रकार पाहून तेजलने माझी व्यवस्थित तपासणी करा, असा आग्रह धरला. परंतु तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तपासण्याची गरज नाही, ताप, सर्दी, खोकला असल्यास तुम्ही सरकारी दवाखान्यात जा, असा सल्ला तिला दिला. त्यानंतर ती वणीतील स्वत:च्या घरी पोहोचली. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर या शहरांमधून येणाऱ्या नागरिकांची तरी गंभीरतेने तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र तशी तपासणीच केली जात नसल्याने वणी शहराला धोका वाढला आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जुजबी तपासणीचा फार्स बंद करावा व कोरोनाबाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांची प्रामाणिक तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.हात धुतल्यानंतर शिक्का होतो गायबज्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले, त्याच्या हातावर शिक्का मारण्यात येतो. वणीतही तसा शिक्का मारल्या जात आहे. परंतु हात धुतल्यानंतर तो शिक्काही गायब होत असल्याने शिक्का मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे होम क्वारंटाईन व्यक्तीची ओळख पुसली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या