शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेत केवळ नेत्यांच्या निकटवर्तीयांनाच कर्जाचा लाभ

By admin | Updated: October 24, 2015 02:23 IST

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्ज लाभापासून सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना हाताशी धरून

पावणेपाच कोटी : सामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनाही डावललेयवतमाळ : प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या कर्ज लाभापासून सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना हाताशी धरून सामान्य नागरिक व पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही वंचित ठेवले आहे. त्याऐवजी आपल्याकडील शाळा, प्रतिष्ठाने व बंगल्यावर राबणाऱ्या मर्जीतील व्यक्तींनाच मोठ्या प्रमाणात हे कर्ज दिले गेले आहे. जिल्ह्यात सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचे कर्ज या योजनेतून आतापर्यंत वितरीत केले गेले आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना या नेत्यांनी हाताशी धरले असून ऐरवी नियमावली दाखविणारे या बँकांचे अधिकारी सदर नेत्यांच्या ताटाखालील मांजर झाल्याचे संतापजनक चित्र या योजनेत पहायला मिळाले. बँकेच्या या अधिकाऱ्यांनी योजनेची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचू दिली नाही. एवढेच काय, त्याबाबत माध्यमांनाही माहिती देणे टाळले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात उद्योजकता वाढीस लागावी म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे रोजगार उभा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करता येणार आहे. १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरूणास आणि इतर उद्योजकास कर्ज घेता येणार आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वितरणासाठी उद्दिष्ट दिले आहे. त्यासाठी मुद्रा प्रधानमंत्री योजनेचा स्वतंत्र अर्ज आहे. या अर्जासोबत ओळखपत्राचा एक पुरावा लागणार आहे. यावर बँक सर्वसामान्य ग्राहकाला पाच वर्षे मुुदतीचे ५० हजारांचे कर्ज वितरित करणार आहे. शिशु लोण, किशोर लोण आणि तरूण लोण असे तीन टप्पे पाडण्यात आले आहे. शिशुु लोणमध्ये ५० हजारांचे कर्ज दिले जाणार आहे. या कर्जाची योग्य परतफेड झाल्यास दुसऱ्यावेळी पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तर तिसऱ्यावेळी तरूण लोण पाच लाखांपासून १० लाखापर्यंत राहणार आहे. या कर्जावर १०.७५ टक्के व्याजदर राहणार आहे. पाच वर्षात कर्जाची परफेड करायची आहे. सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी बँकांवर सोपविण्यात आली होती. मात्र बँकांनी ही माहिती नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांपर्यंतच मर्यादित ठेवली. काही बँकांनी त्यांच्या एजंटांनाही याचा लाभ दिला. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांची नावे सुचवली. याची माहिती जनमानसापर्यंत पोहोचलीच नाही.