शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्यानंतरच ग्रामीण भागातील मुक्कामाला जाणाऱ्या बसेस वाढतील

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : ग्रामीण भागाचे संपूर्ण गणित एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांवर अवलंबून होते. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एसटी बस हमखास ठरलेली होती. कोरोनामुळे ही एसटी बस गावातच येणे बंद झाले आहे. अनेक भागात एसटीचा मुक्काम थांबला आहे. विविध भागात एसटी दररोज एक लाख किलोमीटरचा प्रवास करते. ज्या मार्गावर सर्वाधिक प्रवासी असतात अशाच ठिकाणी एसटी ये-जा करीत आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला जाणारी एसटी सध्या तरी बंद आहे. कोरोना रुग्ण वाढल्यानंतर एसटीने गावाकडचा मुक्काम थांबविला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. यानंतरही एसटीचा गावाकडचा हालटिंग टाईम येत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून खासगी वाहनावर विसंबून राहावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.  मात्र अनेक शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याने काहींची फरपट थांबली आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल सुरूच

कोरोना काळापूर्वी ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये मुक्कामी बस राहात होत्या. कोरोनामुळे अनेक बस बंद करण्यात आल्या. परिणामी त्या गावात बस मुक्कामी राहणे गेल्या दोन वर्षांपासून बंद झाले. गावात मुक्कामी असलेल्या बसच्या वेळापत्रकानुसार त्या गावातील व मार्गावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे वेळापत्रक ठरत होते. बसच्या वेळेनुसार नागरिक आपल्या कामांचे नियोजन करीत होते. मात्र मुक्कामी बस बंद झाल्यामुळे नागरिकांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांचे हाल होत आहे. मुक्कामी बसअभावी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल अद्यापही सुरूच आहे. 

सर्व बसेस आगारातच

जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये असलेल्या एसटी बसेस सध्या आगारात आहे.एकूण बसेसपैकी आठ ते दहा बसेस इतर आगारांमध्ये मुक्कामी आहेत.शाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बसेस सुरू होणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बस सुरू होणार एसटी बसेस सुरू करताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी मिळतात अशा ठिकाणी एसटी बसेस सुरू आहे. ग्रामीण भागात मुक्कामाला असणाऱ्या एसटी बसेस शाळा सुरू झाल्यानंतरच सुरू होणार आहे.  - श्रीनिवास जोशीविभाग नियंत्रक, यवतमाळ

रूग्ण घटले; एसटी कधी धावणार?

शाळा सुरू झाल्या आहे. दहाव्या वर्गातील विद्यार्थी विद्यालयात जाण्यासाठी तयार आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी एसटी मिळत नाही. कुणाला तरी खासगी वाहनाने मोठ्या गावापर्यंत जावे लागते. त्यानंतर पुढील प्रवास सुरू होतो. एसटीने मुक्कामी बसेस सुरू कराव्यात. एसटीअभावी काही विद्यार्थ्यांना चिखल तुडवित शाळेत जावे लागत आहे.  - सुभाष जाधव 

ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचण्यासाठी गावातील पहिली बस सर्वांसाठी महत्त्वाची आहे. इतकेच नव्हेतर रात्रीचा हालटिंग टाईम महत्त्वाचा आहे. या दोन्ही गाड्या गावाकडे येणे बंद झाल्या आहे. यामुळे प्रवाशांना जमेल त्या वाहनाने सकाळी शहराकडे प्रवास करावा लागतो. तरच कामे होतात. खासगी वाहनाने प्रवास करण्यासाठी अवास्तव खर्च करावा लागत आहे.     - मयूर मेश्राम

 

टॅग्स :state transportएसटी