शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांच्या मदतीसाठी अधिकारी पोहोचले विटभट्टीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : कुणीही उपाशी न राहण्यासाठी प्रशासनाची धावपळ, परप्रांतीयांचीही घेतली जातेय काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक परप्रांतीय आणि इतर जिल्ह्यातील नागरिक अडकले आहे. अशांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील विटभट्ट्या व इतर कामाची ठिकाणे गाठून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली.तालुक्यात विविध ठिकाणी कामानिमित्त आलेले छत्तीसगढचे ७७, तेलंगणा २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ मजूर अडकले आहे. तालुका प्रशासनाने त्यांची भेट घेऊन जेवण व निवासाची काय व्यवस्था आहे, याची पाहणी केली. तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी २२ मार्चपासून संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा तसेच राज्याच्या सीमा सील केल्या आहे. त्यामुळे कामे बंद असली तरी अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही.महागाव (क) येथे तेलंगणा राज्यातील २१ आणि अमरावती जिल्ह्यातील २१ नागरिक आहे. यामधील काही जण आयुर्वेदिक जडबुटी विकण्याकरिता तर काही शेतीकामाकरिता आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने धान्य व साबण, सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. मोझर येथे विटभट्टीवर काम करण्याकरिता छत्तीसगढचे ५४ मजूर आले आहे. त्यांना ग्रामपंचायतीने अडीच क्विंटल तांदूळ व इतर वस्तूंचा पुरवठा केला. बोरी येथील विटभट्टीवर छत्तीसगढचेच २३ मजूर असून त्यांना विटभट्टी मालकाने जीवनावश्यक वस्तू पुरविल्या.याप्रमाणे हे नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले असून त्यांची स्थानिक पातळीवर व्यवस्था करण्यात आली आहे. तरीसुद्धा कुणीही उपाशीपोटी राहू नये, या भावनेतून तालुका प्रशासनाने या सर्व ठिकाणी भेटी देऊन त्यांच्या जेवण व राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. तसेच त्यांची विचारपूस करून काही समस्या आहे का, अशी विचारणा करून धीर दिला. त्यांना प्रशासनाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.आमची गावी जाण्याची व्यवस्था कराआम्हाला या ठिकाणी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे. काही कमी-जास्त असल्यास तेही सहन करू. परंतु आमची गावी जाण्याची काहीतरी व्यवस्था करा, अशी विनवनी या नागरिकांनी प्रशासनाला केली. रोजगार बंद झाल्यामुळे हातात काहीच पैसे नाही. त्यामुळे भविष्यात कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्या, या विवंचनेत सर्व मजूरवर्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या