शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा घरठाव करणाऱ्या पोलिसावर गुन्हा

By admin | Updated: November 7, 2016 01:17 IST

दोन महिन्यातच दुसरे लग्न : वर्धेतील तरूणीशी आॅनलाईन प्रेम

दोन महिन्यातच दुसरे लग्न : वर्धेतील तरूणीशी आॅनलाईन प्रेमयवतमाळ : जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका शिपायाने पहिल्या लग्नानंतर दोन महिन्यानेच दुसरा संसार थाटल्याचा प्रकार उघडकीस आला. समाजात रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी आॅनलाईनवर प्रेम जडलेल्या प्रेयसीसोबतसुध्दा नोंदणी विवाह केला. फसवणूक झाल्याने लक्षात येताच आॅनलाईनवर पत्नी झालेल्या मुलीने पोलीस तक्रार दिली. त्यावरून वडगाव पोलिसांनी या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा विनायक पवार (२२) रा. पोलीस मुख्यालय यवतमाळ, असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. कृष्णाचे त्याच्या वडिलांनी जून महिन्यात आशा राठोड हिच्यासोबत लग्न लावून दिले. कृष्णा हा मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी अल्हनवाडी तांडा येथील राहणारा आहे. त्याने यवतमाळ पोलीस दलातच कार्यरत असताना वर्धा येथील २० वर्षीय तरुणीशी आॅनलाईनवर सुत जमविले. त्या तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर या दोघांनी २ आॅगस्ट रोजी नोंदणी विवाह केला. नोंदणी विवाहानंतर कृष्णा आणि त्याची प्रेयसी झालेली पत्नी यवतमाळात राहू लागले. लग्नानंतर आरोपी कृष्णाने तिला तब्बल दीड महिना लॉजवर ठेवले. नंतर यवतमाळच्या आर्णी मार्गावर खोली भाड्याने घेतली. दरम्यान, माहेरावरून पैसे आणण्यासाठी कृष्णाने तगादा लावने सुरू केले. त्याने वर्धेवरून आणालेले ५० हजार रुपये खर्च केले. तरीसुध्दा त्याचा त्रास कमी झाला नाही. शेवटी त्याच्या जाचाला कंटाळून सदर युवती वर्धा येथे परत आली. दरम्यान, कृष्णाचे आशा राठोड नामक महिलेशी लग्न झाल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर आचल कृष्णा पवार हिने कृष्णा व त्याच्या कुटुंबीयानी फसवणूक केल्याची तक्रार वडगाव रोड पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलीसांनी कृष्णा पवार याच्यासह विनायक पवार, ज्योती विनायक पवार, पवनकुमार राठोड, गोकु ळ राठोड, बळीराम राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वडगाव रोड पोलिसांनी सुरू केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)