शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात कोरोना बाधितांचा आकडा ३४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी एकाच दिवशी नव्याने २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह ...

ठळक मुद्देनव्या २० जणांची भर । एकूण रुग्ण ४६

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी एकाच दिवशी नव्याने २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे शासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे.यवतमाळात सध्या उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. आतापर्यंत यवतमाळात ४६ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. विशिष्ट भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे या भागातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येथील नागरिकांना होम क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया शनिवारी पार पडली. या भागातील नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. या भागातील लोक बाहेर पडू नये, बाहेर पडले तरी ते तत्काळ लक्षात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ही उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. या भागातील इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी वायरलेस यंत्रणा उभारण्यात आली आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना पोलीस विभाग वारंवार देत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य विभागाच्या यंत्रणेने शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली.प्रतिबंधित क्षेत्रात नव्या उपाययोजनाप्रतिबंधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाने ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या ठिकाणी १२ अतिरिक्त अधिकारी आणि ६० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. या भागाच्या संरक्षणासाठी सात विभाग तयार करण्यात आले आहे. त्यात भोसा रोड, पांढरकवडा रोड, फळभाजी, अंतर्गत रस्ते आणि जवळचा परिसर असे नियोजन करण्यात आले आहे. सात विभागावर लक्ष ठेवण्यासाठी एक पीएसआय, दिवसा आणि रात्री पाळत ठेवणार आहे. त्यासोबतच होम डीवायएसपी, पीएसआय आणि पोलीस राहणार आहे. या व्यतिरिक्त गंभीर परिस्थिती उद्भवल्यास २२ पोलिसांची अतिरिक्त तुकडी तयार ठेवली आहे. अंतर्गत भागात पाच हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. त्याला बॅरेकेटींग करण्यात आले आहे. हे हॉटस्पॉट एकमेकांना मिळू नये म्हणून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे सज्ज असणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या