शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लिश-देशी दारूवर आता गावठीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

लॉकडाऊनचा कालावधी वाढेल, या भितीपोटी तर अनेक मद्यपींनी एकाचवेळी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला. मात्र तोही फार दिवस पुरला नाही. त्यामुळे आता या सराईत मद्यपींनी गावठी दारू उतारा म्हणून शोधली आहे. १८० मिली गावठी दारूची किंमत केवळ २० रूपये होती. परंतु दारूचा तुटवडा लक्षात घेता, आता हीच गावठी दारू २०० रूपयाला विकली जात आहे.

ठळक मुद्देमोहाची मागणी वाढली : झरीचे जंगल बनले दारू उत्पादनाचे केंद्र, पोलिसांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी : गेल्या एक महिन्यांपासून मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने इंग्लिश व देशी दारूवर मोहापासून बनविलेली गावठी दारू उतारा ठरत आहे. दारूची वाढती मागणी लक्षात घेता झरी तालुक्यातील घनदाट जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर गावठी दारू गाळली जात असून हे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हन पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.एरव्ही व्हिस्की किंवा वाईन पिणाऱ्यांची बंदमुळे मोठी अडचण झाल्याने आता या सराईत मद्यपींनी ‘गावठी’चा मार्ग पत्करला आहे. मोहापासून बनविलेली गावठी दारू आरोग्यासाठी किती चांगली आहे, याचे दाखलेही या सराईत मद्यपींकडून दिले जात आहे. असे असले तरी ही दारू आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एक महिन्यांपासून सर्वच दारू दुकानांना टाळे लागले आहेत. कोरोनामुळे दारू दुकाने बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही महाभागांनी दारूचा साठा मोठ्या प्रमाणावर काढून ठेवला होता. परंतु मागणी लक्षात घेता, हा दारूसाठी अल्पकाळातच संपुष्टात आला.बंददरम्यान साधारणत: दुप्पट दरात विकल्या जाणाºया दारूचा भाव लॉकडाऊनच्या काळात १५ दिवसातच चौपट झाला. वाईन शॉपमधून १५० रूपयांमध्ये मिळणारी दारूची बाटली लॉकडाऊनच्या काळात ८०० ते एक हजार रूपयाला विकली गेली आणि धक्कादायक म्हणजे सराईत मद्यपींनी त्या भावात ती खरेदीही केली. लॉकडाऊनचा कालावधी वाढेल, या भितीपोटी तर अनेक मद्यपींनी एकाचवेळी दारूचा साठा आपल्या घरात करून ठेवला. मात्र तोही फार दिवस पुरला नाही. त्यामुळे आता या सराईत मद्यपींनी गावठी दारू उतारा म्हणून शोधली आहे. १८० मिली गावठी दारूची किंमत केवळ २० रूपये होती. परंतु दारूचा तुटवडा लक्षात घेता, आता हीच गावठी दारू २०० रूपयाला विकली जात आहे.झरी तालुक्यातील जंगलाच्या आडोशाने देशी दारूच्या भट्ट्या मोठ्या प्रमाणावर पेटविल्या जात असून या दारूची विक्रीही घरपोच केली जात असल्याचे चित्र परिसरात पहायला मिळत आहे. वणी परिसरातील अनेक मद्यपींनी आता मोहापासून बनविलेल्या गावठी दारूसाठी झरीची वाट पकडली आहे.उमरीत गावठी दारूची खुलेआम विक्रीपांढरकवडा : लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने गावठी दारूविक्रीला उधाण आले आहे. काही शौकीन महाभाग १० रूपयांचा ग्लास ६० रूपयाला घेऊन आपला व्यसन पूर्ण करित असल्याचे दिसून येत आहे. उमरी येथील यार्डी शाळेकडे जाणारा रस्ता या मंडळीचा ठिय्या बनला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बॉटल, सिगारेटची पाकीटे पहायला मिळत आहे. हातभट्टीची दारू पाण्याच्या बाटलीत आणून घोळक्यात बसून पार्टी करण्यात येत आहे. ही जागा आतमध्ये असून तिकडे कुणाला दिसणार नाही, म्हणून या मद्यपींनी तेथे आपला अड्डा बनविला आहे. उमरी वखारातील कर्मचारी व चौकीदारांनी त्यांना वारंवार हटकले असता, आम्ही तुमच्या डेपोत बसा, असे प्रत्युत्तर दिले जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी