शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

आता पॅकेजचे बियाणेही बोगस

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे

नेर : विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या आहे. आता पॅकेजचे बियाणेही बोगस असल्याच्या बाबी पुढे येत आहे. अशा प्रकारच्या बहुतांश तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. उगवण क्षमता नसतानाही संबंधितांनी बियाणे प्रमाणित कसे केले असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. तालुक्यात ‘एसीएन’ सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी होत्या. दरम्यान शेतकऱ्यांना कृषी विभागाने पॅकेजचे बियाणे वाटप केले. एकाच गावातील १०० बॅग बियाणे उगवलेच नाही. आता त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. एकीकडे ‘एसीएन’ या सोयाबीन बियाणे कंपनीने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. तर दुसरीकडे शासनाच्या बियाण्यांचीही गत अशीच आहे. जमिनीत भरपूर ओल असतानाही पॅकेजचे बीज अंकुरले नाहीत. तालुक्याच्या मालखेड(बु) या एकाच गावात पॅकेजच्या १०० बॅगचे बियाणे वाटप झाले होते. ते सर्व बोगस निघाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.सदर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. अंगद भोयर, सुमित्रा भोयर, प्रणिता ढोके, मोहन ढोके, विनायक गावंडे, विश्वनाथ धोटे, सचिन भोयर, रितेश जामनकर, गणेश जामनकर, मधुकर जामनकर, शेख याकुब शेख मेहबूब, शेख मुस्तफा शेख बशीर, शेख नबी शेख कासम, मासूमबी अब्दुल रहेमान, शेख वजीर शेख रहेमान, देवेंद्र माहुरे, प्रल्हाद उईके, अश्विन काकडे आदी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. यावर तत्काळ कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)