शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

टोल टॅक्सला आता अ‍ॅन्युटीचा पर्याय, जनतेऐवजी शासनाकडून वसुली

By admin | Updated: October 17, 2016 17:27 IST

शासनाने टोल टॅक्सला पर्याय म्हणून अ‍ॅन्युटी योजना आणली आहे. या योजनेतून राज्य मार्गांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

राजेश निस्ताने

यवतमाळ, दि. १७ - शासनाने टोल टॅक्सला पर्याय म्हणून अ‍ॅन्युटी योजना आणली आहे. या योजनेतून राज्य मार्गांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. विशेष असे, गुळगुळीत होणाऱ्या या रस्त्यांचा आर्थिक भार थेट जनतेवर पडणार नाही.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गांचे बांधकाम करुन गुंतविलेली रक्कम टोल टॅक्सच्या माध्यमातून जनतेकडून वसूल केली जात होती. परंतु या टोल टॅक्सला ठिकठिकाणी प्रचंड विरोध झाला. म्हणून शासनाने आता राज्य मार्गांसाठी अ‍ॅन्युटी(आधी गुंतवणूक करा व नंतर टप्प्याटप्प्याने त्याचा परतावा घ्या) ही योजना आणली आहे. या योजनेत कंत्राटदारांना आपल्या पैशांनी राज्य मार्गांचे बांधकाम करावे लागेल. त्यासाठी गुंतविलेला पैसा पुढील पाच वर्षे त्यांना पाच टप्प्यात दिला जाईल. या काळात त्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्या कंत्राटदारावरच राहणार आहे.

आयआरआर निकषाने रस्ते निवड अ‍ॅन्युटी योजनेत रस्ते निवडण्यासाठी आयआरआरचे (इंटरनल रेट आॅफ रिटर्न) निकष लावले गेले. अर्थात त्या राज्य मार्गावर येणारे तीर्थक्षेत्र, वाहनांची वर्दळ, कनेक्टीव्हीटी आदी बाबी तपासल्या गेल्या. यातून रस्त्यांची निवड केली गेली. राज्यात ५०० पेक्षा अधिक रस्त्यांची यादी तयार झाली. एकट्या अमरावती विभागात सुमारे १३ हजार कोटींचे बजेट असलेल्या ८१ रस्त्यांचे प्रस्ताव अ‍ॅन्युटीसाठी पाठविले गेले होते. यातील सुमारे दोन हजार कोटींच्या दोन डझन रस्त्यांची निवड झाली. या रस्त्यांसाठी आता ई-निविदा राबविली जाणार आहे. या रस्ते बांधकामासाठी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला शासनाकडून ही रक्कम पाच टप्प्यात परत मिळणार आहे. आतापर्यंत अशा प्रकारात पथकराच्या माध्यमातून जनतेकडून ही वसुली केली जात होती. मात्र आता त्याचा भुर्दंड शासन उचलणार आहे.

प्रति किलोमीटर तीन कोटींचा दर अ‍ॅन्युटी योजनेअंतर्गत पाच ते सात मीटरचे रस्ते दहा मीटरपर्यंत वाढविले जाणार आहे. त्याचे कॉँक्रीटीकरण करून पूल, उड्डान पूल बांधले जातील. अ‍ॅन्युटीअंतर्गत २० ते २५ किलोमीटर अंतराचे सुमारे ८० ते १०० कोटींचे बजेट असलेले रस्तेही घेतले जाणार आहे. प्रतिकिलोमीटर तीन कोटी रुपये असा दर या रस्त्यांसाठी दिला जाणार आहे. खड्ड्यांमुळे सर्वात वाईट अवस्था झालेल्या राज्य मार्गांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचे टार्गेट विशेष असे जिल्हा परिषद निवडणुकांच्या घोषणेपूर्वी हे संपूर्ण रस्ते गुळगुळीत करण्याचे उद्दीष्ट युती सरकारने ठेवल्यामुळे या मागे राजकीय स्वार्थ असल्याचे दिसून येते. अ‍ॅन्युटी योजनेअंतर्गत महामार्गांच्या या बांधकामांसाठी शासनाला पहिल्या वर्षी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.