शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद हद्दवाढीची अधिसूचना जारी

By admin | Updated: January 23, 2016 02:26 IST

यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना शुक्रवारी शासनाने जारी केली असून शहरालगतच्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश नगरपरिषद क्षेत्रात करण्यात आला आहे.

आठ ग्रामपंचायती : लोहारा एमआयडीसीला वगळले यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दवाढीची अधिसूचना शुक्रवारी शासनाने जारी केली असून शहरालगतच्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश नगरपरिषद क्षेत्रात करण्यात आला आहे. लोहारा महसुली क्षेत्रातील एमआयडीसी क्षेत्र या हद्दवाढीतून वगळण्यात आले आहे. या हद्दवाढीने एक जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सदस्याचे पद गोठविण्यात आले आहे. भोसा, वडगाव रोड, वाघापूर, मोहा, उमरसरा, पिंपळगाव, लोहारा आणि डोळंबा ग्रामपंचायती आता नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ झाल्या आहेत. मात्र लोहारा महसुली हद्दीत असलेले एमआयडीसीचे क्षेत्र हद्दवाढीतून वगळण्यात आले आहे. तसेच शहरालगतच्या डोर्ली आणि गोदनी या ग्रामपंचायतीही नगर परिषद हद्दवाढीत समाविष्ठ करण्यात आल्या नाही. याबाबत शुक्रवार २२ जानेवारी रोजी शासनाचे उपसचिव अमिष परशुरामे यांच्या स्वाक्षरीने हद्दवाढीची अधिसूचना जारी झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून हद्दवाढीच्या चर्चेला शुक्रवारी अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यवतमाळ नगर परिषदेच्या हद्दवाढीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने २५ मार्च २०१५ पर्यंत आक्षेप मागविले होते. यावर अनेकांनी आक्षेप दाखल केले. काही ग्रामपंचायतींनीही नगरपरिषदेत समाविष्ठ होण्यात विरोध केला. परंतु हा सर्व विरोध खारीज करीत अखेर शुक्रवारी नगर परिषदेची हद्दवाढ करण्यात आली. नगर परिषदेच्या हद्दवाढीने ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते, पाणी, वीज आणि नागरी सुविधांसाठी भरपूर निधीही उपलब्ध होणार आहे. तर नगर परिषदेत ग्रामपंचायती आल्याने गृह करासह इतर करात वाढ होणार आहे. नगर परिषदेच्या हद्दवाढीने नगर परिषद सदस्यांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी प्रारंभी वॉर्ड फॉर्मेशन करण्यात येणार आहे. लोकसंख्येनुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात येईल. त्याकरिता आयोग ठरवेल तो निकष राहणार आहे. नगर परिषदेच्या निवडणुका ठरल्या वेळेनुसारच होणार असून या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या समाविष्ठ झालेल्या ग्रामपंचायतीचा कारभार नगर परिषद पाहणार आहे. यासाठी नगर परिषदच निर्णय घेऊन योग्य उपाययोजना करणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नगर परिषदेच्या हद्दवाढीने कुठे आनंद तर कुठे दु:ख अशी स्थिती आहे. मात्र यवतमाळ शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा भार यापुढे नगर परिषदेला सहन करावा लागणार नाही. (शहर वार्ताहर)