शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीन बंद्यांना जेलमध्ये नो-एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कुठल्याही ...

ठळक मुद्देकोरोनाची भीती । आधी १४ दिवस होस्टेलमध्ये क्वारंटाईन, नंतरच प्रवेश

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कुठल्याही कैद्याला कारागृहात थेट प्रवेश बंद केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत आलेल्या प्रत्येक बंद्याला १४ दिवस बाहेरच क्वारंटाईन केल जाते. त्याची दोन वेळ वैद्यकीय तपासणी करूनच कारागृहात एन्ट्री दिली जाते.कारागृहातील कैदी व कर्मचारी सुरक्षित रहावे, त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. कामकाजाच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. कारागृहातील कैद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा आणखी सज्ज केली आहे. कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या रुग्णातही कुठलीही लक्षणे दिसत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे ठरत आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शिक्षा झालेले व न्यायालयीन कोठडी सुनावलेले जवळपास ७० बंदी कारागृहात आले. त्यांना स्वतंत्र व्यवस्था असलेल्या होस्टेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवले. त्या ठिकाणी सुरक्षिततेचा बंदोबस्त लावताना कारागृह प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र कोरोनाचा धोका ओळखून अधिकची जोखीम स्वीकारत आलेल्या प्रत्येक बंद्याला क्वारंटाईन केले जात आहे. त्याला ताब्यात घेताना वैद्यकीय तपासणी केली जाते. नंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावरही वैद्यकीय तपासणी करूनच कारागृहात पाठविण्यात येते. आतापर्यंत क्वारंटाईन असलेल्या ७० जणांंपैकी १५ बंद्यांची कारागृहात रवानगी झालेली आहे.धोका टाळण्यासाठी स्वीकारली जोखीमजिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी म्हणाल्या, कारागृहात सुरक्षिततेच्या सर्वच सुविधा असतात. त्या तुलनेत क्वारंटाईन सेंटर उभारलेल्या होस्टेलमध्ये सुरक्षा सुविधा नाही. त्यामुळे येथे गार्ड लावताना मोठ्या अडचणी येत आहे. मात्र यापेक्षाही कोरोनाचे संकट अधिक गंभीर असल्याने ही जोखीम स्वीकारून कारागृहातील अधिकारी-कर्मचारी काम करीत आहे. त्यामुळेच आतापर्यंत स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

टॅग्स :jailतुरुंगcorona virusकोरोना वायरस बातम्या