शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल भारत’ योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: September 9, 2014 00:41 IST

ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे

नांदेपेरा : ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना आजारांची लागण होऊ नये आणि गावात घाणीचे साम्राज्य पसरू नये, याकरिता शासनातर्फे कोट्यवधी रूपये खर्च करून अनेक योजना राबविल्या जातात़ त्यापैकीच निर्मल भारत अभियान ही योजना गावागावांत राबविली जात आहे़ तथापि सदर योजना ग्रामीण भागात योग्यपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे़ गावात अनेकांकडे शौचालय नसते. त्यामुळे ग्रामस्थ, महिला अगदी गावालगत सायंकाळी व पहाटे रस्त्यालगतच शौचाला जातात. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ महिलांना तर शौचालयाकरिता कसरतच करावी लागते़ घरी शौचालये नसल्यामुळे त्यांना अंधाराची वाट बघात ताटकळत राहावे लागते. ही बाब सर्वांसाठीच लांच्छनास्पद आहे. तरीही त्याकडे अनेक कुटूंब प्रमुख दुर्लक्ष करतात. घरी शौचालय बांधकाम करण्याकरिता शासनातर्फे अनुदान दिले जाते़ मात्र त्या अनुदानातून अनेक ठिकाणी शौचालय पूर्ण होत नाही़ याबाबत नेहमी ग्रामस्थ ओरड करतात. मात्र पदरचे काही पैसे टाकून शौचालय पूर्ण होणे शक्य असते. याचा त्यांना विसर पडतो. ज्या गावात काही ग्रामस्थांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला, त्या घरकुल योजनेत शौचालय बंधनकारक करण्यात आले आहे. शौचालयाचे बांधकाम पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्यांना घरकुल अनुदानाची पूर्ण रक्कम मिळत नसते़ परंतु त्यावरही ग्रामस्थांनी मानी नक्कल लढवून केवळ शौचालयाची शिट बसवून दिखावा तयार करीत अनुदान लाटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी त्यानुसारच घरकुलाची पूर्ण रक्कम पदरात पाडूनही ोतली आहे. काही ग्रामस्थांनी तर शौचालये बांधलीच नाही़ काही गावांतील ग्रामस्थांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले, परंतु शौचालयाचा उपयोगच केला नाही़ त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. (वार्ताहर)