शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने यवतमाळात निर्जळी

By admin | Updated: November 15, 2014 22:53 IST

भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

‘रिलायन्स’चा प्रताप : तहसीलसह पोलीस मुख्यालय जलमय यवतमाळ : भूमिगत ओएफसी केबल टाकण्याच्या कामासाठी मशीनने खोदकाम करताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. अवघ्या तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. या पाण्यामुळे तहसील आणि पोलीस मुख्यालयाचा परिसर जलमय झाला होता. तर अर्ध्या यवतमाळ शहरातील एक लाख नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. दरम्यान खोदकामाविरोधात जीवन प्राधिकरणाने सदर कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यवतमाळ शहरात रिलायन्स जीओ इन्फो कॉम लिमिटेड कंपनीच्यावतीने आॅप्टीकल फायबर केबल (ओएफसी) टाकण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीला मनुष्यबळाच्या सहाय्याने खोदकाम करण्याच्या सूचना होत्या. मात्र कंपनीने अद्यवत मशनरीच्या साहाय्याने शहरात खोदकाम सुरू केले. शुक्रवारी मध्यरात्री तहसील चौकात खोदकाम सुरू असताना जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी फुटली. याची कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्यासाठी ही वाहिनी सुरू केली. मात्र तासाभरात १५ लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. हा प्रकार लक्षात आला तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. जलवाहिनीतील धो-धो वाहणारे पाणी लगतच्या तहसील कार्यालय परिसरात शिरले. संपूर्ण परिसर जलमय झाला होता. तहसील कार्यालयातील कोरडी विहिरही या पाण्याने ओव्हरफ्लो झाली होती. पोलीस मुख्यालय परिसरातही पाणी शिरले. तसेच नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीपर्यंत पाण्याचे लोट पोहोचले होते. तर दुसरीकडे टांंगा चौकापर्यंत पाण्याचा धो-धो प्रवाह वाहत असल्याने अनेक दुकानात पाणी शिरले. पहाटे झालेल्या या प्रकाराने सारेच जण चकीत झाले. त्यानंतर जीवन प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यवतमाळ शहरात आधीच एक दिवस आड पाणीपुरवठा होतो. पाणी पाळीनुसार मुख्य बाजारपेठ, पोलीस वसाहत, पांढरकवडा रोड, भोसा मार्ग आणि धामणगाव मार्गाला शनिवारी पाणी मिळणार होते. मात्र मुख्य जलवाहिनीच फुटल्याने या भागात पाणीच पोहोचले नाही. तब्बल एक लाख लोकांना पाणीच मिळाले नाही. काही भागात दुपारच्या वेळात गढूळ पाणी येत होते. तब्बल एक लाख नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. सायंकाळी जीवन प्राधिकरणाच्यावतीने शहरात ध्वनिक्षेपकावरून सूचना देऊन दुरुस्ती काम होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही, असे सांगितले. (शहर वार्ताहर)