शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ कोटींच्या अपहाराचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेर

By admin | Updated: January 19, 2017 00:50 IST

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात उघडकीस आलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास

निम्न पैनगंगा भूसंपादन : आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडीचा पर्याय आर्णी : निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात उघडकीस आलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणाचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच या तपासासाठी एलसीबीच्या अधिपत्त्याखालील आर्थिक गुन्हे शाखा किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीचा पर्याय दिसतो आहे. किनवटचे प्रकरण सुरू असतानाच आता घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या भूसंपादनातील नऊ कोटी रुपयांची अफरातफर उघडकीस आली आहे. विशेष असे या प्रकरणात केवळ तलाठ्याला आरोपी बनविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. कोरडवाहू जमीन ओलिताची दाखवून हा अपहार केला गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात एकटा तलाठी दोषी असणे शक्यच नाही. त्यामुळे यातील आरोपींची संख्या वाढण्याची आणि त्याची व्याप्ती शासकीय यंत्रणेतील तत्कालीन दंडाधिकाऱ्यांपर्यंत असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय ‘ओलिता’चा लाभ घेणारे शेतकरीही या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे. नऊ कोटींच्या अपहाराचे हे एकूणच प्रकरण गंभीर असले तरी आर्णी तालुका महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणा त्याबाबत तेवढे गांभीर्य बाळगताना दिसत नाही. अपहाराची रक्कम आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता नऊ कोटींच्या या घोटाळ्याचा तपास पारवा पोलिसांच्या आवाक्याबाहेरचा दिसतो आहे. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा किंवा राज्य शासनाची महत्वाची तपास संस्था असलेल्या सीआयडीकडे वर्ग होणे अपेक्षित आहे. नऊ कोटींची रक्कम पाहून पारवा पोलीस सध्या तरी या प्रकरणात हातावर हात देऊन बसल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)