शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रामुळे कोरोना पसरत नाही, माहिती मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे.

ठळक मुद्देडॉ. दीपक अग्रवाल यांचे अनुभवाचे बोल, अनलॉकच्या प्रक्रियेत आणखी जबाबदारी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृत्तपत्राने कोरोनाचा प्रसार होतो ही अफवा आहे. शास्त्रीयदृष्ट्या वृत्तपत्रातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यताच नाही. उलट वृत्तपत्र वाचनामुळे कोरोना महामारीच्या काळात अद्ययावत व अधिकृत माहिती मिळते. वृत्तपत्रापासून कुठलाही धोका संभवत नाही, असे येथील जनरल फिजिशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.वृत्तपत्रांना हात लावल्याने कोरोनाचा धोका वाढतो ही अफवा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील वृत्तपत्र पूर्णत: सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉ. दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले, कोरोना विषाणू संसर्गासोबतच आपले दैनंदिन कामकाज चालवायचे आहे. अशा स्थितीत रोजच्या व्यवहारात वावरताना घ्यावयाची दक्षता आणि स्वत:बद्दल घ्यावयाची काळजी अशा दोन आचारसंहितांचे पालन करावे लागणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी तीन लेअर असलेला कापडी मास्क वापरावा, मास्कला वारंवार हात लावू नये, शेला, दुपट्टा याचा वापर करणे धोकादायक आहे. परस्परांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे, शक्यतोवर गर्दी होईल अशा ठिकाणी जावू नये, सार्वजनिक कार्यक्रमात जावू नये ही खबरदारी रोजच्या व्यवहारात घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका बऱ्याचअंशी कमी करता येऊ शकतो. कामकाजाच्या ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराईड फवारावे, खुर्च्या, दाराचे हॅन्डल व ज्या ठिकाणी वारंवार स्पर्श होऊ शकतो, तेथे सोडियम हायड्रोक्लोराईड फवारणी करावी.ज्यांना उच्चरक्तदाब (बीपी), हृदयरोग, मधुमेह (डायबिटीज) हे आजार आहेत त्यांना कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. त्यांनी पूर्णपणे सुरक्षित राहण्याची गरज आहे. वैयक्तिक आचारसंहितेत योग्य झोप (किमान आठ तास), व्यायाम, योग्य आहार ज्यामध्ये प्रथिने, उकळलेले धान्य, डाळी, दूध, अंडी, मासे, व्हीटॅमिन सी असलेले आंबट फळ, झिंगे हा आहार घ्यावा. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बाहेरचे जेवणे घेणे व इतर खाद्य पदार्थ टाळावे, बरेच जण गरम पाण्याचा वापर करतात मात्र याचा फारसा फायदा होईल असे वाटत नाही.कोरोनाची लक्षणे साधारणत: सर्दी, ताप, खोकला हीच आहे. अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालविता कोरोना टेस्ट करून घ्यावी. रोगाला घाबरुन घरीच औषध घेत बसू नये. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. योग्य उपचार घेतल्यास कोरोना पूर्ण बरा होऊ शकतो. सध्या तरी शासनाने खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचारास परवानगी दिली नाही. ती तपासणी सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयातही उपचार करता येणे शक्य आहे, असे डॉ. दीपक अग्रवाल यांनी स्पष्ट केले.कोरोना काळात आचारसंहिता पाळाकोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या तरी कुठलेही प्रभावी औषध नाही. त्यामुळे वैयक्तिक आचारसंहिताच कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक आचारसंहितेलाच महत्व दिले पाहिजे, असे येथील जनरल फिजीशियन डॉ.दीपक अग्रवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या