लोकमत न्यूज नेटवर्कनेर : कुठल्याही परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करण्याकरिता नेर तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. आता याठिकाणी २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने ही तयारी केली.तालुक्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तालुक्यात होऊच नये यासाठी आरोग्य, महसूल आदी विभागाने उपाययोजना केल्या आहेत. तरीही निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करता यावा म्हणून तयारी केली जात आहे. येथील दारव्हा मार्गावर असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये २०० खाटांचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. यामध्ये ओपीडी, आपात्कालीन वॉर्ड, जनरल वॉर्ड, आॅक्सिजन थेरेपी यासह माईक सुविधा, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. आवश्यक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, मुख्याधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र दुर्गे, ठाणेदार प्रशांत मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे यांचे संयुक्त पथक तालुक्यात करडी नजर ठेऊन आहे.बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या ५१ लोकांना २०० रुपये दंड ठोठावण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे ११ जण कारवाईत अडकले आहे. दोन व्यावसायिकांनाही सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याच्या कारणावरून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. दुकानात दरपत्रक न लावणेही एका व्यावसायिकाला भोवले आहे. याशिवाय इतर प्रकारची कारवाईसुद्धा करण्यात आली आहे.सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. काही लोकांकडून या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घ्यावी लागली. आजच्या कठीण काळात नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.- अमोल पोवार, तहसीलदार नेरघरात राहा, सुरक्षित राहाकोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध उपाय योजिले आहेत. प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनीही घरात राहून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र काही लोकांकडून या आदेशाचे पालन केले जात नाही. अशा लोकांवर कारवाई केली जात आहे. पोलीस आणि नगरपरिषदेकडून कारवाईचा सपाटा लावण्यात आला आहे.
कोरोनाशी लढण्यास नेर तालुक्याची यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST
तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, मुख्याधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र दुर्गे, ठाणेदार प्रशांत मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे यांचे संयुक्त पथक तालुक्यात करडी नजर ठेऊन आहे. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न वापरणाऱ्या ५१ लोकांना २०० रुपये दंड ठोठावण्यात आले आहे.
कोरोनाशी लढण्यास नेर तालुक्याची यंत्रणा सज्ज
ठळक मुद्देकोविड केअर सेंटर, खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात, नियम तोडणाऱ्यांवर कारवाई व दंड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}