शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

नेर शहरातील चार परिसर केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या ...

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये अचानक वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. रविवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यातील रुग्णसंख्या १३ वर पोहोचली आहे. दरम्यान, शहरातील शिवाजीनगर, टोलीपुरा, अंबिकानगर सील करण्यात आले आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.येथील एका हार्डवेअर दुकानात दिवानजी असलेला तेलीपुरा भागातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या संपर्कातील १९ जणांना कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. यातील नऊ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यापैकी हार्डवेअर मालकाच्या वडिलांचा शनिवारी मृत्यू झाला. आता या हार्डवेअर मालकाची आई, दुकानातील नोकर, दिवानजीची पत्नी, मुलगा यासह आठ जण पॉझिटिव्ह निघाले आहे.नेर शहर, पाथ्रड(गोळे) आणि कारखेडा येथील एकूण ३४ जणांची कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर, टोलीपुरा, अंबिकानगर सील करण्यात आले. शहराने परिसरात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्हचे पुणे कनेक्शन आहे. आता या हार्डवेअरमधून किती लोकांनी साहित्य नेले, नऊ पॉझिटिव्ह कुणाकुणाच्या संपर्कात आले याचाही शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.तहसीलदार अमोल पोवार, मुख्याधिकारी नीलेश जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक खोडवे, प्रभारी विस्तार अधिकारी अशोक राऊत, नानासाहेब घोंगळे, शंकर भागडकर यासह पोलीस, नगरपरिषद, महसूल विभागाची यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या