शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

By admin | Updated: July 28, 2014 23:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या माजी आमदाराने जाहीर सभेत काँग्रेसच्या खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना काँग्रेसकडून अपमानजनक वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या माजी आमदाराने जाहीर सभेत काँग्रेसच्या खासदारांचा खरपूस समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर कार्यक्रमात केलेल्या गंभीर आरोपाने उमरखेड तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव सातव उमरखेड येथे शेतकरी मुलींना लॅपटॉप वाटपाच्या कार्यक्रमासाठी सोमवारी आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा कार्यक्रम सुरू होता. महागाव येथे बैठकीचे निमित्त करून काही वेळात ते निघून गेले. त्यानंतर या कार्यक्रमात वसंत साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर यांनी चक्क खासदारांचाच खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या १५ दिवसांमध्ये खासदार सातव यांनी माजी आमदारासह इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कुठल्याही सार्वजनिक कामासाठी लावलेले फोन उचलले नाहीत. आजही ते उचलले जात नाहीत. उमरखेड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अपमानजनक वागणूक दिली जाते. हिंगोलीचा हा खासदार सर्वसामान्यांचा नाही, त्यांना जनतेशी देणे-घेणे नाही, त्यांना केवळ मुंबई-दिल्लीतच रस आहे. त्यांनी या मतदारसंघातील लोकांचा विश्वासघात केला असा आरोप प्रकाश पाटील देवसरकर यांनी या सभेत केला. त्याच प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत करायची की नाही हे ठरवावे लागेल, असेही प्रकाश देवसरकर यांनी सांगितले. त्यावेळी कार्यकर्ते टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराने काँग्रेसच्या खासदारावर जाहीर सभेत केलेल्या या आरोपाने खळबळ उडाली आहे. दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदार संघ काँग्रेसने हिसकावून घेतला. यासाठी राजीव सातव यांनी आपले राजकीय वजन वापरले. राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना आपला हा मतदारसंघ गमवावा लागला. लोकसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील व माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह अनेक नेत्यांनी सातव यांच्या विरोधात काम केले हे सर्वश्रृत आहे. तर आमदार विजय खडसे यांच्या विरोधात खुलेआम दंड थोपटून प्रकाश पाटील यांनी भाजपा उमेदवाराचा प्रचार केला हे उघड आहे. मात्र निवडणुकीपूर्वी उमरखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा राजस्थानी भवनमध्ये झाला होता. त्यावेळी सर्व नेते व कार्यकर्ते हजर होते. राष्ट्रवादीला सन्मानाची वागणूक आणि विकासात्मक कामे करताना विश्वासात घेण्याचे राजीव सातव यांनी जाहीर केले. मात्र आता जनतेचा विश्वास घात झाल्याचा आरोप होत आहे.