शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

तुंबलेली नाली मोकळी करण्यास नगरपंचायत असमर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:41 IST

महागाव : येथील प्रभाग एकमध्ये सांड पाण्याचे गटार तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाचा ६० महिन्यांचा कार्यकाळ ...

महागाव : येथील प्रभाग एकमध्ये सांड पाण्याचे गटार तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपंचायत प्रशासनाचा ६० महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतरही तुंबलेली नाली मोकळी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

या प्रभागात सिमेंट नाली बांधण्यात आली; परंतु ती काही उपयोगाची नाही. सांडपाणी जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने परिसरातील सांडपाणी काढून देण्यास नगरपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या संदर्भात अनेकांनी नगरपंचायतीला सूचना दिल्या. मात्र, या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या गटारातून मोठी दुर्गंधी पसरत आहे. कोरोनापेक्षाही या गटारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दाट वसाहत असलेल्या ठिकाणी निर्माण केलेल्या गटाराची अद्याप उपसणी झाली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी अर्धा कोटी खर्ची घालूनही नगरपंचायत प्रशासन या कार्यात असफल ठरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरणार असल्याचे नागरिक सांगत आहेत.

बॉक्स

अनेक वर्षांपासून नरक यातना कायमच

मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिक नरक यातना भोगत आहेत. एकदा तत्कालीन उपनगराध्यक्ष उदय नरवाडे यांच्या प्रयत्नातून ही नाली मोकळी करण्यात आली. परंतु, काही दिवसांतच परत ती तुंबली, असे नाना पतंगे यांनी सांगितले. गटाराला लागून बांधण्यात आलेली सिमेंट नाली शोभेची वस्तू ठरल्याचे बळिराम राठोड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही ठिकाणी अतिक्रमण असून, त्यामुळे नाली मोकळी करण्यास अडचण निर्माण झाल्याने हा विषय प्रलंबित राहिल्याचे माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे यांनी सांगितले.