शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात एकतर्फी प्रेमातून युवतीचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 05:00 IST

सुवर्णाचे आई व वडील पांढुर्णा (केदारलिंग) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तर  तिचा भाऊ श्याम काही कामानिमित्त देवठाणा येथे गेला होता. यावेळी घरी सुवर्णा व तिची वृद्ध आजी होती. सुवर्णा भांडे घासत असताना आरोपी आकाश तिच्या घरी पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आजीला एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर भांडे घासत असणाऱ्या सुवर्णावर चाकू व गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला.  

ठळक मुद्देरामपूरनगरची घटना : कुटूंब बाहेरगावी गेल्याचा साधला डाव, आजीला कोंडले, आरोपीला धनसळ जंगलातून अटक

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद :  एकतर्फी प्रेमातून तरुणाने एका युवतीचा चाकू व गुप्तीने भोसकून खून केला. तालुक्यातील रामपूरनगर येथे शनिवारी (१५ मे) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही धक्‍कादायक घटना घडली.  यातील आरोपीला सायंकाळच्या सुमारास खंडाळा पोलिसांनी धनसळ परिसरातील जंगलातून अटक केली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपी युवकाचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूरनगरात ही घटना घडली. मृत युवती सुवर्णा आणि आरोपी आकाश हे दोघेही एकाच  गावात राहात होते. त्यांच्यात ओळख झाली. आकाश हा सुवर्णावर  एकतर्फी प्रेम करीत होता. सुवर्णाने दहावीपर्यंतचे शिक्षण गावात घेतले. त्यानंतर तिने पुसद येथे बारावीचे शिक्षण घेऊन नंतर  डीएड पदविका प्राप्त केली. त्यानंतर ती गावी आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी सुवर्णाचे आई व वडील पांढुर्णा (केदारलिंग) येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तर  तिचा भाऊ श्याम काही कामानिमित्त देवठाणा येथे गेला होता. यावेळी घरी सुवर्णा व तिची वृद्ध आजी होती. सुवर्णा भांडे घासत असताना आरोपी आकाश तिच्या घरी पोहोचला. त्याने सुवर्णाच्या आजीला एका खोलीत कोंडून ठेवले. नंतर भांडे घासत असणाऱ्या सुवर्णावर चाकू व गुप्तीने सपासप वार केले. काही क्षणातच सुवर्णा रक्‍ताच्या थारोळ्यात कोसळली. त्यानंतर आकाशने घटनास्थळावरून पळ काढला.  या घटनेची माहिती गावकऱ्यांनी खंडाळा पोलिसांना व तिच्या पालकांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठले. गंभीर जखमी अवस्थेत सुवर्णाला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र काही वेळातच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पाच पथके होती मागावरआरोपी फरार झाल्याने खंडाळा पोलिसांनी त्याचा शोधासाठी पाच पथक तयार केले होते. अखेर शनिवारी सायंकाळी आकाशला धनसळ परिसरातील जंगलातून अटक करण्यात आली.  दोनही कुटुंब रोजमजूरीवरच गुजरान करणारे  मृतक सुवर्णा व आरोपी आकाश या दोघांचेही कुटुंब सर्वसाधारणच आहे. रोजमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काही महिन्यांपासून आकाश सुवर्णावर एकतर्फी प्रेम करीत होता. याची तिला खबरबातही नव्हती. अखेर शनिवारी आकाशने तिचे घर गाठून निर्घृण खून केला. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस