शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा भोसकून खून, वडिलांच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे.

ठळक मुद्देआर्णी तालुका : सुकळीतील किरकोळ वादाचे रक्तरंजित पडसाद

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : किरकोळ वादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. तालुक्यातील सुकळी येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. सूर्यकांत साहेबराव वारसवाड असे मृताचे नाव असून या हल्ल्यात सूर्यकांतचे वडील साहेबराव हे देखील गंभीर जखमी झाले आहे.या प्रकरणात आर्णी पोलिसांनी गणेश रामभाऊ मोरे (२६) आणि शुभम रामभाऊ मोरे (१९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. वारसवाड आणि मोरे हे दोन्ही कुटुंब सुकळी येथे शेजारी राहतात. त्यांच्यात सोमवारी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. यात गणेश आणि शुभम हे दोघेही सूर्यकांत आणि साहेबराव यांना शिवीगाळ करीत होते. हा वाद अत्यंत विकोपाला गेला. यात गणेश आणि शुभम या दोघांनी मिळून चाकूहल्ला केला. सूर्यकांत वारसवाड यांना बराच मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. सूर्यकांतचा जागीच मृत्यू झाला. त्याचे वडील साहेबराव वारसवाड या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. मात्र तेही गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी गावकऱ्यांनी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.दरम्यान मृतक सूर्यकांत वारसवाड याची बहीण विद्या अर्जून घेरवाल (२५) हिने सोमवारी रात्रीच आर्णी पोलिसात घटनेबाबत तक्रार दाखल केली.त्यावरून पोलिसांनी लगेच सुकळी गाठून दोन्ही आरोपी भावंडांना ताब्यात घेतले. तसेच हल्ल्यात वापरलेला चाकूसुद्धा जप्त केला. विद्याच्या फिर्यादीवरून भादंवि ३०२, ३०७, २९४, ५०४, ३४ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद उलेमाले, हेडकॉन्स्टेबल अरुण पवार, संजय भारती, गजानन खांदवे, संदीप गोहणे, महेश बाडेलवार तपास करीत आहे.लॉकडाऊनमुळे गाव भांडणापासून अनभिज्ञकोरोना प्रतिबंधासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. खुनाची घटना घडली त्यावेळी सुकळी गावातही सर्वत्र सामसूम होती. त्यामुळेच एवढा मोठा जीवघेणा हल्ला झाल्यावरही गावकऱ्यांना घटनेची माहिती उशिरा कळली. गावात नेहमीप्रमाणे वर्दळ असती तर कदाचित हे भांडण विकोपाला जाण्यापूर्वीच कुणी तरी मध्यस्थी करून सोडविले असते, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस गावात पोहोचल्यावरही आरोपी अरेरावी करीत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Murderखून