विवाहित प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:20+5:30

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्या महिलेच्या प्रेताची ओळख पटली. हीच काजल गुणवंत मोरे असल्याचे तिच्या आईने ओळखले.

The murder of the beloved by the married lover | विवाहित प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

विवाहित प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

Next
ठळक मुद्देलाडखेडचे प्रकरण । अज्ञात मृतदेहाचे रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वारज शिवारातील एका विहिरीत अज्ञात महिलेचे प्रेत आढळले होते. पोलिसांनी या प्रेताची ओळख पटविल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले. विवाहित प्रियकराने आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून तिचा खून केला. ही घटना ३ जुलैला घडली. पोलिसांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून थेट आरोपीला अटक करण्याची कारवाई पार पाडली.
५ जुलैला अज्ञात महिलेचे प्रेत विहिरीत असल्याची माहिती जामवाडी येथील पोलीस पाटील सुधाकर डोळे यांनी दिली. यावरून लाडखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्या महिलेच्या प्रेताची ओळख पटली. हीच काजल गुणवंत मोरे असल्याचे तिच्या आईने ओळखले.
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने हाच धागा पकडून तपास सुरू केला. त्यात काजल मोरे हिचे तिवसा (ता. दारव्हा) येथील गजानन कैलास सुदगुते (२२) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले. तपास पथकाने गजाननला ताब्यात घेतले व कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. ३ जुलैला काजल हिला वारज शिवारातील एका विहिरीत ढकलून तिचा खून केल्याचे सांगितले. आरोपी गजानन सुदगुते याला लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
 

Web Title: The murder of the beloved by the married lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून