शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

गौतम बुद्ध, सम्राट अशोकांचा वारसा जपण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या भोन परिसरात मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले. या प्रतिकांना नष्ट करण्यासाठी भोन परिसरात पूर्णा नदीवर धरण बांधण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या मदतीने काढण्यात आले.

ठळक मुद्देबुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क : राज्यस्तरीय रॅली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तथागत गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक मौर्य यांचा वारसा जपला जावा, यासाठी यवतमाळ येथे रॅलीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. राज्यात एकाचवेळी ३६ जिल्हे आणि ३६० तालुक्यात रॅली काढली गेली. यवतमाळ येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीचे नेतृत्त्व राज्याध्यक्ष सुषमाताई राजदीप यांनी केले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात पूर्णा नदीच्या भोन परिसरात मौर्यकालीन प्राचीन भोन बौद्ध स्तुपाचे अवशेष आढळले. या प्रतिकांना नष्ट करण्यासाठी भोन परिसरात पूर्णा नदीवर धरण बांधण्याचे आदेश पुरातत्त्व विभागाच्या मदतीने काढण्यात आले. सदर अवशेष मिटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासोबतच पवनी स्तुप, अडम स्तुप, सोपारा स्तुप, कोल्हापूरचा मौर्यकालीन स्तुप नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेले पुणे येथील पहिले बौद्ध विहार नष्ट होण्याचा प्रयत्न आहे. त्याचे जतन करण्यासाठी शासनाकडून काहीही प्रयत्न होत नाही. शासनाच्या या भूमिकेविरोधात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने आंदोलन सुरू केले आहे.यवतमाळ येथे रॅलीत भन्ते सारिपुत्त, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या राज्य अध्यक्ष कुंदाताई तोडकर, बहुजन मुक्ती पार्टीच्या सारिका भगत, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विजयराज शेगेकर, नेटवर्कचे तालुका संयोजक संजय सावळे, रंजना देवळकर, संगीता तेलंग, कांबळे, सिद्धार्थ भुजाडे, विनोद थूल, प्रणाली रणवीर, नौका सोनेकर, वनिता नळे, शीतल सावळे, ताई खरे, स्विटी कपिले, दीपमाला भगत, विशाखा गजभिये, संघमित्रा गायकवाड, राजू उमरे, चंदा वाघमारे, अर्चना महल्ले, कविता नागदिवे, प्रेरणा तागडे, चंदन वानखडे, प्रेरणा गुजर, संघमित्रा गायकवाड, आशा मेश्राम, वैशाली भितकर, सुरज खोब्रागडे, प्रणिता दिघाडे आदी सहभागी झाले होते.