शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

आंधळ्या प्रेमात मातेने पोटच्या पोरांनाही सोडले

By admin | Updated: September 14, 2016 01:06 IST

प्रेमासाठी वाट्टेल ते.. हे परवलीचे वाक्य प्रत्यक्ष जगताना अनेक आयुष्य उद्ध्वस्त करीत असते.

अजब पवित्रा : पती, पोलिसांसमोर प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय
आरिफ अली  बाभूळगाव
प्रेमासाठी वाट्टेल ते.. हे परवलीचे वाक्य प्रत्यक्ष जगताना अनेक आयुष्य उद्ध्वस्त करीत असते. लग्नानंतर सुखाचा संसार करणाऱ्या महिलेच्या आयुष्यात एक तरुण प्रियकर आला. त्याच्यासोबत जगता यावे म्हणून चक्क आईने आपल्या दोन लेकरांनाही सोडून दिले. प्रेयसी बनलेल्या त्या महिलेतील मातृत्व हरले. एवढेच नव्हेतर, प्रत्यक्ष पती आणि पोलिसांसमोरच तिने प्रियकरासोबत राहण्याचा निर्णयही जाहीर करून टाकला...
नातेसंबंधांना जबर हादरा देणारा हा प्रकार तालुक्यातील पाचखेड गावात घडला. ही विवाहिता गेल्या काही वर्षांपासून पाचखेड येथे आपल्या पतीसोबत सुखाने संसार करीत होती. त्यांच्या संसार वेलीवर दोन फुलेही उमलली. पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा यांच्या कौतुकात पती रमून गेला होता. पण या सुखी कुटुंबाचे भविष्य काळाने वेगळेच लिहिलेले होते. गावातीलच एका २२ वर्षीय तरुणासोबत विवाहितेचे सुत जुळले. भेटीगाठी वाढल्या. शेवटी हे प्रेमियुगुल पतीच्या दृष्टीस पडले. शांत स्वभावाच्या पतीने कायदा हातात न घेता प्रकरण हाताळण्याचा निर्णय घेतला. त्याने तडक बाभूळगाव पोलीस ठाणे गाठले. पत्नीच्या परपुरुषाशी असलेल्या संबंधाची माहिती लेखी स्वरुपात पोलिसांना दिली.
पोलिसांनीही एक संसार मोडू नये, या भूमिकेतून पावले उचलली. संबंधित प्रियकर, विवाहित महिला आणि त्यांच्या सर्व निकटस्थ नातेवाईकांना १२ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. मात्र, सर्वांपुढे त्या विवाहितेने आपण प्रियकरासोबतच राहणार असल्याचा निर्णय बोलून दाखविला. नातेवाईकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पतीनेसुद्धा झालेल्या चुकीची माफी देऊन मुलांकडे पाहून नांदायला येण्याची विनंती केली. मात्र, प्रेमात आंधळी झालेली विवाहिता काहीही ऐकायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.

मुलांचा सांभाळ करणार
पोटच्या पोरांना सोडून ती विवाहिता प्रियकरासोबत निघून गेली. हतबल पती दोन्ही मुलांना घेऊन गावाकडे परतला. यापुढे मुलांचा सांभाळ आपणच करणार असल्याचे त्याने नातेवाईकांना सांगितले. मात्र, या घटनेने पती-पत्नीतील विश्वासाच्या नात्याला जबर हादरा बसला.