शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुलींसाठी महिनाभर धगधगणार ‘क्रांतीज्योती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन शाळेपासून दूर असलेल्या मुलींचा शोध घेणार आहे. शाळाबाह्य मुलींची यादी तयार करून ती जाहीरही केली जाणार आहे.

ठळक मुद्दे‘लेक वाचवा लेक शिकवा’ : जिल्ह्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची विशेष मोहीम

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुलींनी शाळेत जाणे पाप आहे, असा अपसमज बाळगणाऱ्या भारतीय समाजाला स्त्री शिक्षणाचा महामार्ग दाखविणाºया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शुक्रवारी बालिका दिन, महिला मुक्ती दिन म्हणून सर्वत्र साजरी होत आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने मात्र यानिमित्त चक्क महिनाभर स्त्री शिक्षणाची मशाल अधिक प्रज्वलित करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविले जाणार आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने हे अभियान ३ ते २६ जानेवारीपर्यंत राबविले जाणार आहे. यात विविध स्पर्धांसह प्रत्यक्ष कृती युक्त कार्यक्रम राबविला जाणार आहे. शिक्षण विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये जाऊन शाळेपासून दूर असलेल्या मुलींचा शोध घेणार आहे. शाळाबाह्य मुलींची यादी तयार करून ती जाहीरही केली जाणार आहे. शाळाबाह्य मुलींना नजीकच्या शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. मित्र गटाची स्थापना करून त्यात सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश केला जाणार आहे.राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीया अभियानासाठी शिक्षण विभागाने ३ ते २६ जानेवारीपर्यंतचा दिवसनिहाय कार्यक्रम तयार केला आहे. त्यात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीचाही समावेश आहे. यानिमित्त गावातील कर्तृत्ववान व्यक्तींची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाणार आहे.मुलींचा आहार, समुपदेशन आणि मैदानी खेळया अभियानात मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांना संतुलित व सकस आहार कसा देता येईल याबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका यांची मदत घेतली जाणार आहे. गावातील संघर्षातून यशस्वी झालेल्या महिलांची मुलाखत, सत्कार होणार आहे. प्रतिकुल परिस्थितीतून मुलींना उच्च शिक्षण देणाºया माता-पित्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. ‘गुड टच बॅड टच’ याबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्यासोबतच मुलींसाठी लांब उडी, उंच उडी, धावणे अशा मैदानी स्पर्धा घेतल्या जाणार आहे.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेSchoolशाळा