शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’ बंदीविरुद्ध यवतमाळात सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा

By admin | Updated: August 22, 2015 02:35 IST

जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.

२४ आॅगस्टला आयोजन : भारत बंदमध्ये सहभाग यवतमाळ : जैन समाजात शतकानूशतके चालत आलेल्या संथारा (सल्लेखना) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. यामुळे जैनधर्मीयांच्या भावना दुखावल्या असून न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी यवतमाळातील सकल जैन समाजाच्यावतीने २४ आॅगस्ट रोजी मूक व शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजेंद्रनगर स्थित मावजी देवजी निसर जैन स्थानकातून सकाळी ९.३० वाजता शांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे. गुरु महाराज जिनेंद्र मुनी आदी संत आणि सतींचा आशीर्वाद घेऊन हा मोर्चा स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक, एलआयसी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. या दिवशी जैनधर्मीयांची प्रतिष्ठाने बंद राहतील. तसेच शाळेतील जैन विद्यार्थी व नोकरीतील जैन कर्मचारी देखील विरोध नोंदविण्यासाठी या दिवशी सुटी घेणार आहे. जैन धर्मामध्ये आत्मा आणि शरीर वेगवेगळे मानले जाते. आत्मकल्याणाला प्राथमिकता दिली असून शरीराला केवळ आत्मकल्याणाचे माध्यम मानले गेले आहे. शरीराच्या माध्यमातून मानव साधना करून उच्चत्तम श्रेणी प्राप्त करू शकतो. साधकाला उच्चत्तम श्रेणीत जाण्यासाठी मोह त्यागने अत्यावश्यक आहे. बाह्य साधनांनी मोह दूर सारताना शरीराचा मोह ही हटवावा लागतो. तेव्हाच मनुष्य पूर्ण साधनेत रममाण होतो आणि याच मानवी अवस्थेला संथारा असे म्हटले जाते. ही संपूर्ण संतुष्ट होण्याची स्थिती आहे. याला कदापिही आत्महत्या म्हटले जाऊ शकत नाही. आत्महत्या राग, मोह, लोभ, छलकपट आदी बाबींमुळे केली जाते. या वाईट गोष्टींचा त्याग करणे हा जैन धर्माचा उद्देश आहे आणि यासाठी संथारा अतिशय आवश्यक आहे. परंतु उच्च न्यायालयाने संथारा व्रत परंपरेवर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे जैनधर्मीयांमध्ये तीव्र भावना उमटत आहे. या निकालाविरोधात आयोजित मूक मोर्चा आणि भारत बंदमध्ये जैनधर्मीय पुरुष, महिला, तरुण, तरुणी आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पुरुषांनी पांढरा ड्रेस व महिलांनी चुनरीची साडी घालून सहभागी व्हावे तसेच जिल्ह्यातील सर्व जैन बांधवांनी आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन देण्याचे आवाहनही सकल जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)