शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणित मतदार यादीतील पाने गहाळ

By admin | Updated: November 7, 2016 01:04 IST

शासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नगरपरिषदेच्या प्रमाणित मतदार यादीतील पानेच्या पाने गहाळ झाल्याचे पुढे आले आहे.

यवतमाळ नगरपरिषद : प्रभाग १८ मधील प्रकार यवतमाळ : शासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नगरपरिषदेच्या प्रमाणित मतदार यादीतील पानेच्या पाने गहाळ झाल्याचे पुढे आले आहे. मतदार यादीत नावांचा घोळ तर आहेच. परंतु आता त्यातील पानेच गहाळ होत असल्याने मतदार यादीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत मोठ्याप्रमाणात अनियमितता आहे. नगरपरिषदेने प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीतून अनेकांची नावे गहाळ झाली आहे. आता तर यवतमाळातील प्रभाग क्रमांक १८ च्या भाग २४१ मधून मदतारांच्या नावाची अनेक पाने गहाळ आहेत. निवडणूक प्रचारसाठी येथील उमेदवारांनी नगरपरिषद प्रशासनानकडे रितसर पैसे भरून प्रमाणित यादी घेतली. या यादीतूनच प्रभागातील अनेक मदतारांची नावे गहाळ असल्याचे आढळून आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने मतदार यादी तयार करण्याचे खासगी व्यक्तीला कंत्राट दिले. या याद्या तयार झाल्यानंतर त्याची पडताळणी येथील प्राधिकृत अधिकाऱ्याने केली नाही. त्यामुळे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. येथील प्राधीकृत अधिकाऱ्याने दिलेल्या यादतील भाग क्रमांक २४१ मध्ये ६०२१ नंतर थेट ६३३६ असेच मतदार दाखविण्यात आले आहे. ९ हजार ४४६ मतदार संख्या असलेल्या या प्रभागातील प्रमाणित मतदार यादीतून नावे गहाळ असल्याने तेथील नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मतदार यादीच्या प्रमाणित हार्डकॉपीजमध्ये घोळ असल्याने प्रभाग १८ च्या उमेदवारांनी स्फॉट कॉपी पालिकेत मागितली. पालिकेडून देण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये यापेक्षा ही भयंकर प्रकार असल्याचे उघड झाले. मतदार यादीतील तब्बल २२ पानेच गायब आहेत.यावरून नगपरिषदेतील प्राधिकृत अधिकारी निवडणूक काळातही गांभीर्याने काम करत नसल्याचे दिसून येते. आता याची निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे प्रभाग १८ मधील उमेदवारांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)