बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:27+5:30

पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या तिच्या मैत्रिणीच्या वडिलानेच घात केला. पाथरवाडी जंगलात गाडल्याची कबुली आरोपीने दिली.

The missing girl was murdered by her girlfriend's father | बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात

बेपत्ता मुलीचा मैत्रिणीच्या पित्यानेच केला घात

Next
ठळक मुद्देहातणीच्या विद्यार्थिनीचा मृतदेहच सापडला : पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न ठरले निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोफाळी पोलीस ठाण्यातील मुळावा येथील विद्यार्थिनी १२ मार्चपासून बेपत्ता होती. या मुलीला कुठल्याही परिस्थितीत जीवंत, सुरक्षित परत आणावे यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठ वर्षाच्या विद्यार्थिनीच्या तिच्या मैत्रिणीच्या वडिलानेच घात केला. पाथरवाडी जंगलात गाडल्याची कबुली आरोपीने दिली. अखेर पोलिसांना विद्यार्थिनीचा कुजलेला मृतदेह शुक्रवारी हाती लागला.
गजानन विठ्ठल भुरके (४०) रा. शांतीनगर मुळावा असे आरोपीचे नाव आहे. हातणी येथील आठ वर्षीय विद्यार्थिनी मुळावा येथील शाळेत शिकण्यासाठी येत होती. गुरुवार १२ मार्चला ही विद्यार्थिनी अचानक शाळेतून बेपत्ता झाली. तिची सायकल शाळेतच होती. तिच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हाही पोफाळी पोलिसांनी दाखल केला. तक्रार मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वच तपास पथकांना मुलीचा शोध घेण्याच्या कामात गुंतविले. या तपास पथकांनीही रात्रीचा दिवस करून विद्यार्थिनीचा शोध सुरू केला. मात्र मुलीला जीवंत व सुरक्षित आणण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.
पाथरवाडी जंगलात असा घडला थरारक घटनाक्रम
गुरुवारी १२ मार्चला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्या विद्यार्थिनीला ओळखीतीलच एका व्यक्तीने दुचाकीवर बसवून नेले. पोलिसांना इतकी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या दिशेने तपास ुसुरू केला. सीसीटीव्ही फुटेज मिळताच आरोपी हा गजानन भुरके असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक दिशेने तपास सुरू केला. गजाननचे लोकेशन मिळताच त्याला रोहडा शेतशिवारातून अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपी गजाननने गुन्ह्याची कबुली देत घटनाक्रमच सांगितला. मुलीवर दृष्कृत्य करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेले. पाथरवाडी जंगल परिसरात तिच्यासोबत दृष्कृत्य केले. पीडित मुलीने ही बाब घरी सांगू नये म्हणून तिचा गळा आवळून ठार मारले. नंतर तिचा मृतदेह जंगलात गाडल्याचे सांगितले. पोलिसांनी ते घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. या तपासात मुळावा येथील ग्रामस्थ व युवकांनी पोलिसांना मोलाचे सहकार्य केले.
यवतमाळ मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांची चमू घटनास्थळी पोहोचली. जागेवरच तिचे शवविच्छेदन करण्यात आले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात पोफाळी ठाणेदार कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, सचिन पवार, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, गजानन डोंगरे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, विशाल भगत, किशोर झेंडेकर, मो. जुनेद मो. ताज, सुरेंद्र वाकोडे, पंकज बेले, सय्यद साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, सायबर सेलचे प्रमुख अमोल पुरी, दिगांबर पिलावन, अजय निंबोळकर, रोशनी जोळगेकर, प्रगती कांबळे, रेवण जागृत, विठ्ठल मोकाडे, विशाल भगत, जय जाधव, रावसाहेब शेंडे, सुनील जाधव, प्रकाश बोंबले, श्याम लांडगे, मोहन काटे यांनी केला.

फाशीच्या मागणीसाठी महिलांचा ठिय्या
विद्यार्थिनीवर अत्याचार करून खून केल्याचे वृत्त परिसरात पसरताच जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिळोणा घाटातच ठिय्या दिला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली.

Web Title: The missing girl was murdered by her girlfriend's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.