मंत्रालयीन ३० कक्षाधिकारी ग्रामसभेत

By Admin | Updated: May 25, 2015 02:27 IST2015-05-25T02:27:12+5:302015-05-25T02:27:12+5:30

पंचायत राज व्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी थेट ध्येय धोरणांची आखणीही गावपातळीवरून केली जाणार आहे.

Ministries 30 Class Officers Gram Sabha | मंत्रालयीन ३० कक्षाधिकारी ग्रामसभेत

मंत्रालयीन ३० कक्षाधिकारी ग्रामसभेत

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेला अधिकाधिक बळकट करण्यासाठी थेट ध्येय धोरणांची आखणीही गावपातळीवरून केली जाणार आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी मंत्रालयातील ३० कक्षाधिकाऱ्यांनी रविवारी दोन ग्रामसभांना उपस्थिती लावली.
अमरावती येथील प्रबोधिनीमध्ये मंत्रालयीन कक्षाधिकाऱ्यांना ग्रामविकास योजनांच्या अनुषंगाने प्रशिक्षण दिले जात आहे. यात सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यावर फोकस आहे.
यातील एक भाग म्हणून मंत्रालयीन ३० कक्षाधिकाऱ्यांनी आर्णी तालुक्यातील डोळंबा तर दिग्रस तालुक्यातील महागाव येथे असलेल्या ग्रामसभेत सहभाग घेतला. सुक्ष्म नियोजन आराखडा गावपातळीवर तयार केला जात आहे. त्यावरूनच शासनाच्या विविध ग्रामविकासच्या योजनांची रुपरेशा ठरणार आहे. यापूर्वीसुद्धा मंत्रालयीन कक्षाधिकाऱ्यांनी विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत सहभाग घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालंदर पठारे त्यांच्यासोबत होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Ministries 30 Class Officers Gram Sabha