मंत्र्यांंना सेनेचा घेराव

By Admin | Updated: July 23, 2014 00:11 IST2014-07-23T00:11:47+5:302014-07-23T00:11:47+5:30

गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी करीत शिवसेनेने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना घेराव घातला. गावातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला.

Ministers sacked the army | मंत्र्यांंना सेनेचा घेराव

मंत्र्यांंना सेनेचा घेराव

सावळी सदोबा : गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी करीत शिवसेनेने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांना घेराव घातला. गावातील समस्यांचा पाढा यावेळी वाचण्यात आला.
ना.शिवाजीराव मोघे एका कार्यक्रमासाठी त्यांच्याच मतदारसंघातील सावळी सदोबा येथे सोमवारी गेले होते. यावेळी त्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अभिजित शिंदे, भाजपाचे मिलिंद चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिकांनी त्यांच्या वाहनाला घेराव घातला. यावेळी उपस्थितांनी समस्यांचा पाढा वाचला. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, शेतकऱ्यांना तत्काळ विमा मिळवून द्यावा, नायब तहसील कार्यालयाऐवजी तहसील कार्यालय सावळी येथे सुरू करावे, पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, रस्त्याचे काम त्वरित करावे, जनावरांसाठी चारा डेपो उघडावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी राजू काळे, चारुदत्त रार्घोते, राजू राऊत, दिलीप राठोड, संतोष शिरपूरकर, सुरेश देवकते, गजानन शिंदे, भारत हांडे, दुर्गेश कर्णेवार, कबीर जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ministers sacked the army