‘मेडिकल’मध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त मुलीला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:24+5:30

पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजाला हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस हा मेंदूज्वराचा आजार असल्याचे स्पष्ट झाले.

'Medical' to a girl suffering from a debilitating illness | ‘मेडिकल’मध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त मुलीला संजीवनी

‘मेडिकल’मध्ये दुर्धर आजाराने ग्रस्त मुलीला संजीवनी

Next
ठळक मुद्देसंयुक्त प्रयत्नांना यश : हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिसचा उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या १३ वर्षाच्या मुलीला दाखल करण्यात आले. ३ फेब्रुवारीला ही मुलगी रुग्णालयात आली. प्रथम तिला मेंदूज्वराचे लक्षण (हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस) आढळले. मात्र तिची प्रकृती खालवतच जात होती. अखेर डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्त करून तिला पूर्णत: बरे केले.
पूजा सुखराम राठोड असे या मुलीचे नाव आहे. ती आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील आहे. पूजाचे आई-वडील मोलमजुरी करणारे असल्याने आर्थिक परिस्थितीही सर्वसाधारणच आहे. तिला गंभीर आजार झाल्याचे लक्षात येताच शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे रक्त चाचणीमध्ये पूजाला हरपीस सिम्प्लेक्स इन्सेफॉलॅटिस हा मेंदूज्वराचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराचा विषाणू थेट मेंदूवर आघात करत असल्याने रुग्णाच्या जीवाला सर्वाधिक धोका असतो. परिस्थिती लक्षात घेऊन मेडिसीन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शेखर घोडेस्वार यांनी विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांच्या मार्गदर्शनात एक चमू तयार केली. त्यामध्ये सहायक प्रा.डॉ. चंद्रशेखर धुर्वे, डॉ. राम मुरकुट, डॉ. आशीष कुसरे, डॉ. अब्दुल पाटणकर यांचा समावेश केला. या चमूने पूजावर उपचार सुरू केले. तिला अँटी व्हायरल ड्रगची आवश्यकता होती. तसे मागणीपत्र प्रशासनाकडे पाठविण्यात आले.
अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी स्थानिकस्तरावर ही औषधी खरेदी करण्यास तत्काळ परवानगी दिली. तातडीच्या उपचारामुळे व नर्सिंग स्टाफ, डॉक्टर्स यांनी घेतलेल्या काळजीमुळे पूजाला जीवनदान मिळाले. ती ठणठणीत बरी होऊन १६ फेब्रुवारी रोजी आपल्या गावी परत गेली.

Web Title: 'Medical' to a girl suffering from a debilitating illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य